शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या दिवसात ती गावे होतात नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर्वतांच्या मधात उंच भागावर वसलेला आहे.

ठळक मुद्दे७५ वर्षांनंतरही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षाच : शासनाचे आश्वासन हवेतच, गावकऱ्यांची समस्या कायम

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील मुरकुटडोह-दंडारीच्या टोकापर्यंत ७५ वर्षांचा कार्यकाळ लोटूनही अद्यापही पक्के रस्ते तयार करण्यात आले नाही. पावसाळ्यात मुरकुडोह १,२,३ आणि टेकाटोला, दंडारी या पाच गावांचा संपर्क रस्त्याअभावी तुटत असल्याने ही गावे तालुक्यापासून नॉट रिचेबल होत असल्याने गावकऱ्यांना पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या गावांसाठी काळ्या पाण्याचीच शिक्षा आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने या गावांची दखल घेतली नसल्याने गावकºयांची समस्या कायम आहे.शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर्वतांच्या मधात उंच भागावर वसलेला आहे. या वस्त्यांच्या समुहामध्ये मुरकुटडोह १,२,३ तसेच टेकाटोला आणि दंडारी या गावांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गावापर्यंत पोहोचणे म्हणजे कठीण काम आहे. मुख्य कारण म्हणजे या गावापर्यंत जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही. येणारा वर्ष हे देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु यानंतरही देशातील अनेक गावे मुख्य मार्गाशी जुळले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यात मुरकुटडोह-दंडारीसारख्या गावांचा समावेश आहे. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी या भागातील मुलभूत सोयींच्या अभावाबद्दल व ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. मात्र प्रशासनाने याची अद्यापही त्याची दखल घेतली नाही. काही वर्षापूर्वी मुरकुडोह दंडारीचा प्रवास करण्यासाठी दरेकसा, डहाराटोला, बेवारटोला, नवाटोला येथील डोंगराळ मोठे घाट असलेल्या मार्गाने जावे लागत होते. मात्र पावसाळा सुरु होताच सहा महिन्यासाठी त्या गावांचा संपर्क तुटून जायचा आणि त्या गावातील लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु नंतर या मार्गावर बेवरटोला धरण तयार करण्यात आले. मोठ्या धोक्याचे घाट व वळण असल्याने या मार्गाचा उपयोग बंद झाला. त्या गावांना मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी नंतर शासनाने नवीन ठिकाणातून रस्ता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. धनेगाव-दलदलकुही, टेकाटोला असा नवीन मार्ग शोधण्यात आला. काही प्रमाणात आधीपेक्षा सोपा असला तरी या गावापर्यंत जाण्यासाठी दलदलकुहीनंतर घनदाट जंगलाची वाट मधात अनेक पर्वत घाट आणि त्यातच एक मोठे लाल पहाडाचे घाट चढावे लागते.उन्हाळयाच्या दिवसात कसे बसे या मार्गावरुन वाहनाची ये-जा होऊ शकते.परंतु पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे मुळीच शक्य नाही.पावसाळ्यात पहाडावरील पाणी रस्त्यावरुन वाहन असताना रस्ते दलदल झालेले असतात.अशात या रस्त्यावरुन पायी चालणे ही जीव घेणाप्रवास ठरु शकतो. अशात पक्के डांबरी रस्ते आणि सोबतच पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था व नाली बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही याकडे प्रशासनाचे लक्ष गेले नसल्याने या पाच गावांची समस्या कायम आहे.मुख्यमंत्री सडक योजनेचे वाजले बारादरेकसावरुन दलदल कुही मार्ग १५ किमीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर समूहातील पहिला गाव टेकाटोला पोहचता येते टेकाटोलावरुन पुढे जात असताना काही अंतरावर उजव्या बाजूला दंडारी गाव पुढे गेल्यास मुरकुडोह ३, मुरकुडोह २ आणि शेवटी अंतीम टोकावर मुरकुडोह-१ वसलेला आहे.तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या गावांना परस्परांशी जोडण्यासाठी रस्ते मंजूर करण्यात आले. परंतु रस्ते निर्मितीच्या नावावर केवळ सावरासावर करण्यात आली. पावसाळ्यात या गावांना परस्पर एकमेकांशी संपर्क राहत नाही. वर्षानुवर्षे एका बेटावर असलेले हे गाव इतर गावांशी किंवा मुख्यालयाशी वर्षभर जोडण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा सवाल गावकरी करीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा