शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे वाकुल्या दाखविणे सुरूच

By admin | Updated: August 4, 2015 01:26 IST

पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के

गोंदिया : पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारच्या दुपारपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस बऱ्यापैकी झाला तर अनेक ठिकाणी शिरवाही आला नाही. त्यामुळे पावसाच्या या वाकुल्या दाखविण्याने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे.जून महिना दुष्काळी स्थितीत गेला. यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या कार्य सुरू केले. परंतु नंतर पावसाने धोका दिला. जवळपास १०-१२ दिवस वातावरण कोरडे राहिले. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने रोपवाटिकेला जीवदान मिळाले होते. परंतु नंतर पुन्हा वातावरण कोरडे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हेक्टरमध्ये रोपवाटिका व आवत्या घालण्यात आल्या. ग्रामीण भागातील मजूर व महिलांद्वारे धापपीक रोवण्याचे कार्य केले जाते. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे लोकांनी घरी बसूून रहावे लागत आहे.कृषी विभागानुसार, जिल्ह्यात १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्यात आली आहे. तर ३४ हजार ६५२ हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. तसेच १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील पाच-सहा दिवसांनंतर रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले. जोरदार मेघगर्जना झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आशा होती. परंतु २ आॅगस्टच्या रात्री व ३ आॅगस्टच्या सकाळी रिमझिमच पाऊस पडला. तो सुद्धा काही भागातच झाला. आकाश अजूनही ढगाळलेलेच आहे. (प्रतिनिधी)पीक वाचविण्यासाठी प्रयत्नजिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांपैकी इटियाडोह १५.०३, सिरपूर येथे १६.२१, पूजारीटोला येथे ४०.९३ व कालीसरार येथे १५.३० टक्के पाणीसाठा आहे. इटियाडोहामधून एक हजार क्यूसेक पाणी २६ जुलैपासून सतत सिंचनासाठी सोडले जात आहे. सिरपूर जलाशयाचे पाणी पूजारीटोला जलाशयासाठी चार दिवसपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती आहे. आठवडाभर पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीरजिल्ह्यात आकाशात केवळ ढग पसरलेले दिसत आहेत व रिमझिम पाऊस पडत आहे. चांगल्या दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे. आठवडाभरात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाग बियाणे खरेदी करून रोपवाटिका घालणारे व रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आर्थिक संकट ओढवण्याचे वातावरण दिसू लागले आहेत.