शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सोसाट्याच्या वादळासह गारांचा पाऊस

By admin | Updated: May 6, 2016 01:30 IST

दिवसभर उन्ह तापल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. सहा वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळ सुटला

गारांसह पावसाने झोडपले : तुमसरात गारा, वरठीत पडझड, भंडारा, मोहाडी शहरात वीज पुरवठा खंडितभंडारा : दिवसभर उन्ह तापल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. सहा वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळ सुटला त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाडा वाढला आहे. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकले. भंडारा वरठी, मोहाडी याठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. कापणीयोग्य धानाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.तुमसरात गारांचा पाऊसतुमसर : बुधवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह तुमसर शहर व परिसरात सुमारे दीड ते दोन तास पाऊस बरसला. उष्णतेपासून नागरिकांची काही अंशी सुटका झाली. बुधवारी सायंकाळी ५ वाजतापासून आकाशात ढगांनी गर्दी केली. दुपारी २ पासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६ वाजता ढगांमुळे अंधार पसरला. पाहता पाहता मेघगर्जनेसह व सुसाट वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहने जागीच थांबली. तुमसर शहर व परिसरात लहानलहान गाराही पडल्यामुळे बच्चे कंपनी आनंद लुटत होते.वरठी घरांची पडझड वरठी : अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे वरठी येथील अनेक घरांचे पत्रे उडाले. नेहरू वॉर्डातील डॉ.बाबुराव कारेमोरे यांच्या घरांचे छतावरील सुरक्षा कठडे लगतच्या दुकानाच्या टिनाच्या शेडवर पडले. दरम्यान तिथे काम करणारे विजय अवजेकर यांच्या अंगावर ते पडल्यामुळे विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला भंडारा येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. हनुमान वॉर्डचे ग्रामपंचायत सदस्य थारणोद डाकरे यांच्या घरावरचे सिमेंट पत्रे उडाले.मोहाडीत नुकसानमोहाडी : सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या धोधो पावसामुळे विजेचे खांब वाकले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छत उडून अस्ताव्यस्त पसरले होते. रस्त्यावर तारा पडलेल्या होत्या. खंडीत वीज पुरवठ्यामुळे अंधार पसरलेला होता. पवनीत वीज कोसळलीपवनी : पवनी शहरात सायंकाळी पवनी किल्ल्यावर वीज कोसळली. यात कित्येक वर्षापासून असलेला वृक्ष जळून खाक झाला. काही काळ शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज कोसळली असली तरी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. पालांदूर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झालेला होता.