यावेळी तालुका अध्यक्ष एन. एल. मेश्राम, शहर महासचिव बी. बी. बन्सोड, सर्कल कामठा ग्रामशाखा अध्यक्ष आशा डोंगरे, तालुका उपाध्यक्ष मनोहर भावे, विजय मेश्राम, मयाराम गजभिये उपस्थित होते. संचालन मेश्राम यांनी केले. आभार सूर्यमनी रामटेके यांनी मानले. ग्राम शाखा बटाना येथे बौद्धविहारात तालुकाध्यक्ष एन. एल. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत रविवारी वर्षावास कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम, केंद्रीय शिक्षक अरविंद सूर्यवंशी, सर्कलचे अध्यक्ष ओमकार उके, उपाध्यक्ष बाबूलाल गडपायले, मुंडीपार सर्कलचे महासचिव अजय गजभिये, बोधाचार्य तुलसीदास मेश्राम, महासचिव नवरगाव सर्कल हेमराज चंद्रीकापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन तालुक्याचे महासचिव कोमलकुमार नंदागवली यांनी केले. आभार चंद्रिकापुरे यांनी मानले. प्रास्ताविक कोषाध्यक्ष उत्तम रामटेके मांडले.
कामठा आणि नवरगाव सर्कल येथे वर्षावास कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST