शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माेलमजुरी करणाऱ्या हातात रेल्वेचे स्टेअरिंग ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:32 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : आपल्याजवळ काही नाही असे समजून निराश होऊन परिस्थितीसमोर हात टेकण्यापेक्षा ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : आपल्याजवळ काही नाही असे समजून निराश होऊन परिस्थितीसमोर हात टेकण्यापेक्षा ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे केव्हाही चांगले असते. यात अपयश आले तरी चालेल, पण प्रयत्न करणे सोडून न देता जो परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो तो निश्चितच जीवनात यशस्वी होताे. आलेल्या संकटाचा बाऊ न करता आपल्या ध्येयासाठी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हातात आता रेल्वेचे स्टेअरिंग आले आहे. त्याच्या प्रवासाने अश्रूंची फुले झाल्याचे चित्र आहे.

बादल बालकदास गजभिये, रा. आसोली, ता. गोंदिया असे त्या युवकाचे नाव आहे. २०१३ ला त्याच्यावरील आईचं छत्र हरपलं. अत्यंत विपरीत परिस्थितीत बुद्धविहारात अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास केली. दोन वर्षांपूर्वी लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव आलं आणि आता तो तीन महिन्यांपूर्वी नोकरीवर रुजू झाला. कॅन्सरग्रस्त बादलची आई तो बारावीला असतानाच मरण पावली. लहानगा विशाल (बादलचा लहान भाऊ) केवळ सातव्या इयत्तेत शिकत होता. आईची कॅन्सरशी झुंज, आपल्या पश्चात आपल्या मुलांचं काय होईल ही आईच्या डोळ्यातली काळजी. औषधाला पैसे नव्हते. सरिता (बादलची बहीण) डी.एड.ला होती. आईला रोज बाराशे रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन लागायचं. यासाठी तिने मोलमजुरी केली. लोकांच्या घरची धुणी-भांडी केली. आपल्या दोन भावंडांना जगविण्यासाठी आणि आईच्या औषध पाण्यासाठी आईला कसेही करून वाचवता यावा म्हणून सरिता रोज मजुरी करू लागली. ती त्या दोन्ही भावंडांची आई झाली. स्वतःच्या गरजा मारून, पोटाला चिमटा घेऊन भावंडांची ती माय झाली. तिच्या मेहनतीला भावांनी साथ दिली. अशातच २०१३ मध्ये तिची भेट सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर यांच्याशी झाली. त्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत शक्य तेवढी मदत केली. पोरांनी सुद्धा परिस्थितीची जाणीव ठेवत मेहनतीचं चीज केलं. बादलचे वडील बालपणीच मरण पावले. आईच्या छत्रछायेत हे तिन्ही भावंडे जगत होती; पण नियतीला ते पाहवले नाही. त्यांची आई कॅन्सरने गेली. दुर्दैवाचे दशावतार कमी होते की काय, तिचं घर पडलं. त्या गावच्या शिक्षकांनी या भावंडांना सविता बेदरकर यांच्याकडे पाठविले. या घटनेला आता सात-आठ वर्षे लोटली.

..........

पुस्तके हेच आपले नातेवाईक

गरिबाला कोणी नातेवाईक नसतात. ज्या वेळेस गरज असते तेव्हा आप्तस्वकीय, सारेच पाठ फिरवतात. आपली पुस्तके, आपला अभ्यास हेच आपले नातेवाईक समजायचे. पोरांनी हे मनात ठेवलं आणि वाटचाल सुरू झाली. लोको पायलट झाल्यानंतर बादलला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद त्याच्या बहिणीला झाला. तेवढाच आनंद सविता बेदरकर यांना झाला.

..............

अन् बादलने दिला रिझल्ट

बादलचेही आयटीआय झाले होते. मी आता मजुरीवर जाईन, असे त्याने बेदरकर यांना सांगितले. यावर त्यांनी मी महिन्याचे एक हजार रुपये तुला पाठवते आणि सरिताच्या लग्नाचा किराणा वाचला आहे, तू मला एका वर्षाच्या आत रिझल्ट दे, असे सांगितले. ही बाब बादलने देखील मनावर घेतली. त्याने भरपूर मेहनत घेतली. यानंतर त्याचे एक नाही, दोन नाही तर तीन ठिकाणी सिलेक्शन झाले अन् तो लोको पायलट म्हणून रुजू झाला.

.....

बुद्धविहारात केला अभ्यास

बादल गावातील बुद्धविहारात रात्रभर अभ्यास करायचा. त्याने आपले ध्येय समोर ठेवून त्यासाठी परिश्रम घेतले. त्याचे परिश्रम फळाला आले असून त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून रेल्वेत लोको पायलट म्हणून अलीकडेच पदभार स्वीकारला आहे. बादलसारख्या प्रचंड मेहनती मुलांचा आदर्श समाजानं खरंच डोळ्यांसमोर ठेवावा. हे भीमपुत्र बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून घडत आहेत. इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याचं काम करीत आहेत.