शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक झाले एलईडीमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:44 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाऱ्या एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये शंभर टक्के एलईडी लाईट लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली.

ठळक मुद्देवर्षाकाठी सव्वा कोटी रुपयांची बचत : पर्यावरणाचे संवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाऱ्या एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये शंभर टक्के एलईडी लाईट लावण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. यामुळे विजेची बचत करुन त्यासाठी वर्षाकाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे.दिवसेंदिवस वीज टंचाईची समस्या बिकट होत चालली आहे. वीज टंचाईमुळे बऱ्याच भागातील नागरिकांना भारनियमनाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. सर्वाधिक वीेज निर्मिती ही कोळशापासून केली जाते. मात्र कोळशाचा साठा मर्यादित असून तो केव्हा तरी संपुष्टात येईलच. वाढत्या विजेच्या वापरामुळे भविष्यात विजेच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात निर्माण होणाºया विजेपेक्षा मागणी अधिक असल्याने बाहेरील राज्यातून अतिरिक्त दराने वीज खरेदी करावी लागत आहे. परिणामी विजेच्या दरात सुध्दा वाढ झाली आहे. शिवाय पर्यावरणावर सुध्दा त्याचे दुष्परिणाम होत आहे. यावर सर्व गोष्टींवर मात व विजेची बचत करण्यासाठी एलईडी लाईटचा पर्याय पुढे आला. एलईडी लाईटमुळे दररोज लागणाºया विजेच्या युनिटपेक्षा कमी युनिट लागतात. त्यामुळे वीज बिलात कपात करणे शक्य आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने हीच बाब हेरून बिलासपूर, रायपूर, नागपूर या तिन्ही मंडळातंर्गत येणाºया एकूण २६० रेल्वे स्थानकांवर आणि वर्कशाप, कारखाने यासर्वच ठिकाणी शंभर टक्के एलईडी लाईट लावले. रेल्वे विभागाने पहिल्या टप्प्यात या तीन विभागातील २६० रेल्वे स्थानकावर एलईडी लाईट लावण्याचे काम देखील वेळेत पूर्ण केले. त्यामुळे रेल्वे विभागाला वर्षाकाठी विजेसाठी कराव्या लागणाºया खर्चाची बचत करणे शक्य झाले आहे.१३ लाख ८५ हजार वीज युनिटची बचतदक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने तिन्ही मंडळातील २६० रेल्वे स्थानकावर एलईडी लाईट लावल्यामुळे वर्षाकाठी १३ लाख ८५ हजार युनिट विजेची बचत करणे रेल्वे विभागाला शक्य झाले. तसेच यासाठी होणाऱ्या १ कोटी १८ लाख रुपयांची बचत करणे रेल्वे विभागाला शक्य झाले आहे. यामुळे प्रवाशी सुविधांमध्ये वाढ करण्यास मदत झाल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.रेल्वेचे प्रशासकीय कार्यालय होणार एलईडीमयदक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने सुरूवातीला एलईडी लाईटचा प्रयोग २६० रेल्वे स्थानकावर केला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर आता तिन्ही मंडळातील सर्व प्रशासकीय भवन, कर्मचारी वसाहती व रेल्वेच्या लहान मोठ्या सर्वच कार्यालयात एलईडीे लाईट लावण्यात येणार आहे. त्याचे काम देखील काही ठिकाणी सुरू झाल्याची माहिती आहे.