शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

गोंदिया : रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील ५० ...

गोंदिया : रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली आहे. खरीप हंगामाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नातेवाइकांकडे उधार उसणवारी आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

खरीप हंगामाप्रमाणेच जिल्ह्यात रब्बी हंगामातसुद्धा शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामात ११४ धान खरेदी केंद्रावरून २२ लाख ४४ हजार क्विंटल धानाची खरेदी केली. ही रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४१७ काेटी रुपये असून यापैकी आतापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तर, ३२१ काेटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना करण्यात आले नाही. चुकारे करण्यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अद्यापही निधी वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ५० हजारांवर शेतकरी चुकाऱ्यांसाठी बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामातील धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, स्वत:च्या विकलेल्या धानाचे पैसे त्यांना न मिळाल्याने नातेवाईक आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगून हात वर करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली आहे.

............

बोनसचे १५० कोटी रुपये थकले

खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटल धानापर्यंत प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, यापैकी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना बोनसची ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्याला १३९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तर, उर्वरित ५० टक्के बोनस देण्यासाठी १५० काेटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

................

गोदामांची समस्या कायम

खरीप आणि रब्बी हंगामांत एकूण ५५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १५ लाख क्विंटल धानाची आतापर्यंत भरडाईसाठी उचल करण्यात आली आहे. तर, उर्वरित ४० लाख क्विंटल धान अद्यापही गोदामातच पडला आहे. तर, धान साठवून ठेवण्यासाठी बऱ्याच प्रमाणात शाळांचासुद्धा वापर करण्यात आला आहे. गोदामांची समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.