शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:30 IST

यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला.

ठळक मुद्देयंदा भासणार पाणीटंचाई : रब्बी पीक न घेण्याचे आदेश फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा अत्यल्प पाऊस व पिकांवरील रोगामुळे जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अशात यंदा जिल्हा प्रशासनाने रब्बी पीक घेऊ नका असा फतवा काढला. परंतु बाघनदी परिसराला लागून असलेल्या गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०० हेक्टरमध्ये रब्बी पीकासाठी नर्सरी टाकल्या आहेत.यंदा ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाण्याची पातळी खालावली आहे. लोकांनी २०० मीटरपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे. धानाच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवरून जाणाऱ्या बाघनदीत पाणी आहे. त्या पाण्याचा वापर मध्यप्रदेशातील शेतकरी करतात. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या बाघनदीच्या पाण्याचा वापर का करू नये, म्हणून तालुक्यातील नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी २०० हेक्टर क्षेत्रात रब्बी धानाची लागवड करण्याची तयारी दर्शविली आहे.धापेवाडा, महालगाव, मुर्दाळा, लोधीटोला, नवेगाव, कामठा, छिपीया, बिरसी, खातिया, परसवाडा, चिरामनटोला, वडेगाव, गिरोला, नवेगावगाव या गावातील शेतकऱ्यांनी रब्बी धानासाठी नर्सरी टाकली आहे. तालुक्यात ३ हजार ७०० हेक्टर रब्बी धान पीकाचे क्षेत्र आहे. यापैकी २०० हेक्टर मध्ये रब्बी पीक घेतले जात आहे.जलयुक्त शिवारचा थोडा आधारसन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ७७ गावांची निवड करण्यात आली. त्या गावातील २ हजार ४९० कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर ३६ कोटी २६ लाख रूपये खर्च करण्यात आले. यातून २० हजार ५४२ दसलक्ष घनमीटर पाणी साठा झाला. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खोल न जाण्यास मदत झाली. २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करून ४४१ कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जलयुक्त शिवारचा काहीसा लाभ होणार आहे.मामा तलाव राहिले रितेसोळाव्या शतकात मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. या तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या शेतात नेण्याचा माणस शासनाचा होता. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४१८ मालगुजारी तलावांचा पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यापैकी ३४७ तलावांची कामे सुरू केली होती होती. ११५ तलावांतील गाळ काढण्यात आला होता. या तलावांतील ६ लाख ६९ हजार ५८७ घनमीटर गाळ काढण्यात आला. परंतु अल्प पावसामुळे या तलावांमध्ये पाणीच गोळा झाले नाही.प्रशासन हतबलशेतकºयांना धानपीक घेऊ नका असे प्रशासन म्हणून शकत नाही, दुसरीकडे पाण्याची टंचाई आहे.अश्या परिस्थितीत धानपीक लावणाºया शेतकऱ्यांना त्यांच्या पीकासाठी अखेरपर्यंत पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतो. मग प्राशसनाकडून पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी या रबी पिकाला पाणी मिळू नये यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे फक्त विज कनेक्शन कापल्याशिवाय किंवा मोठे भारनियम हे कारण पुढे केल्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.