शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रापेवाडाची जागा अद्याप ‘अधांतरीच’

By admin | Updated: January 18, 2015 22:45 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना रापेवाडातील जागा पसंत आली आहे. मात्र या जागेवर पाणलोट प्रकल्प आल्याने या जागेवर घनकचरा

गोंदिया : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना रापेवाडातील जागा पसंत आली आहे. मात्र या जागेवर पाणलोट प्रकल्प आल्याने या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारता येणार की नाही याबाबत शंकाच आहे. प्रकल्पासाठी ही जागा अत्यंत उपयुक्त असल्याने पालिकेने या जागेच्या सविस्तर अहवालासाठी लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंत्यांकडे मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप अहवाल न मिळाल्याने प्रकल्पासाठी निवडलेली ही जागा अद्याप अधांतरीच आहे. शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असून विद्यमान जिल्हाधिकारी या प्रकल्पासाठी गंभीर दिसून येत आहे. कटंगी येथील जागेला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे विमान प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. शिवाय अन्य काही कारणांमुळे ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले होते.समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील झुडपी जंगलाची आराजी ३५.१९ हेक्टर जागा बघितली होती. त्या जागेतील सुमारे चार हेक्टर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कार्यवाही सुरू होती. अशातच नगर परिषद अध्यक्ष कशिश जायस्वाल, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी भड यांनी २ डिसेंबर रोजी रापेवाडा येथे बघून ठेवलेल्या जागेची पाहणी केली. प्रकल्पाच्या दृष्टीने ही जागा सर्वांनाच आवडल्याने ३ डिसेंबर रोजी नगर रचना सहायक संचालक श्रीमती थूल यांनीही तहसीलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगर रचना विभागातील सलाम कुरेशी व अन्य अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली. एवढेच नव्हे तर नगर परिषदेला आवश्यक एवढ्या जागेची मोजणी सुद्धा करविली. मात्र या दरम्यान सदर जागेवर एक जलाशय प्रस्तावित असल्याची माहिती पालिकेच्या हाती लागली. त्यामुळे ही जागा हातून गेल्यास पुन्हा दुसऱ्या जागेसाठी धावपळ करावी लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे टेंशन वाढले आहे. ही जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने सर्वांचे लक्ष या जागेकडे लागले आहे. प्रस्तावित जलाशयापासून ५०० मीटर अंतरावर पालिकेला प्रकल्पासाठी जागा हवी आहे. अशात या जागेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज करून जागेचा सविस्तर अहवाल मागितला आहे. आता याला कित्येक दिवस लोटले असून लघुपाटबंधारे विभागाकडून मात्र जागेबाबत पालिकेला अहवाल देण्यात आला नाही. अहवाल न मिळाल्यामुळे आताही या जागेवर जलाशयाची जागा सोडून प्रकल्पासाठी जागा उरणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अद्याप प्रकल्पासाठी बघितलेली ही जागा अडकून पडली असून सर्वांच्याच नजरा लघुपाटबंधारे विभागाच्या अहवालाकडे लागून आहेत. (शहर प्रतिनिधी)