शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित सोडवा

By admin | Updated: July 18, 2016 00:13 IST

अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी निवेदन, चर्चा व लाक्षणिक संप केले.

धरणे आंदोलन : प्राथमिक शिक्षकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन गोंदिया : अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी निवेदन, चर्चा व लाक्षणिक संप केले. मात्र समस्या आजही प्रलंबितच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पालकमंत्री बडोले यांच्यासमोर झालेल्या चर्चेत १५ दिवसांत अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्याबाबत आश्वासन मिळाले होते. मात्र ती मागणी अजुनही पूर्ण न झाल्याने शनिवार (दि.१६) प्राथमिक शिक्षकांनी धरणे आंदोलन करून मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार, शिक्षणाधिकारी यू.के. नरड यांनी काढलेल्या पत्रान्वये कायम झाल्याची नोंद, हिंदी-मराठी सूटची नोंद, संगणकाची नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वेतनवाढ लागू करावी. मात्र त्यामुळे ४० ते ७० टक्के शिक्षक वेतनवाढीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे सदर निर्णय त्वरित मागे घेण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळाने १२ जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित वेतनवाढ व संगणक सूट देण्याचे कबूल केले होते. परंतु आजपर्यंत गटशिक्षणाधिकाऱ्यांना तश्या प्रकारचे पत्र पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळेच शिक्षक समितीने शनिवारी जि.प. समोर एकदिवसीय धरणे केले. प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांमध्ये सर्व शिक्षकांना वेतनवाढ लागू करावी, कायमची नोंद, हिंदी-मराठी सूट, संगणक उत्तीर्ण यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, जि.प. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता त्वरित लागू करावा, पदविधर शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना एकस्तर पदोन्नतीनुसार आगावू वेतनवाढ लागू करावी, पदविधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करावी, प्रशिक्षित निमशिक्षकांना नियमितचे आदेश निर्गमित करावे, डीसीपीएस कपातीचा हिशेब सादर करावा, शिक्षण समितीवर संघटनेचा प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात यावे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिक्षकांना १५ टक्के नक्षल भत्ता सन २००९ पासून द्यावे, गहाळ प्रमाणपत्रांसाठी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)