शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पिपराच्या तीन लक्ष रोपवाटिकेतील मातीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:34 IST

तुमसर तालुक्यातील पिपरा गावाशेजारील नाल्याजवळ तीन लक्ष वृक्षांची रोपवाटिका तयार करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभाग ही रोपवाटिका तयार करीत आहे. ४ लक्ष ३६ हजार ९६६ रुपये येथे खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देनाला काठ पोखरल्याचा संशय : चार लक्ष ३६ हजारांचा निधी

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील पिपरा गावाशेजारील नाल्याजवळ तीन लक्ष वृक्षांची रोपवाटिका तयार करण्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभाग ही रोपवाटिका तयार करीत आहे. ४ लक्ष ३६ हजार ९६६ रुपये येथे खर्च केला जात आहे. संकरीत बीज येथे उपयोगात आणले जात असून नाल्याशेजारील एका शेतातून माती येथे आणण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी रोपवाटिकेपासून हाकेच्या अंतरावर नाला खोदकामातील मातीचा उपयोग केल्याचे दिसून येते.एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष असे घोषवाक्य राज्य शासनाच्या वनविभागाचे आहे. गाव, ओसाड, जमीन, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, जंगल हिरवेगार करणे आादी ठिकाणी वृक्ष लागवडीचा धडाकेबाज कार्यक्रम मागील तीन वर्षापासून सुरु आहे. तुमसर तालुक्यातील तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावर पिपरा गावाजवळील नाल्याशेजारी रोपवाटिका तयार करण्यात येत आहे. तीन लाख वृक्ष पिशवीत बीज घालून तयार करण्याची कामे जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आली. प्लास्टीक काळ्या पिशवीत येथे बीज घालून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. निम्म्यापेक्षा जास्त कामे येथे झाली आहेत. राज्याच्या वनविभागाने २०१९ करिता १३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. रोपवाटिकेकरिता गाळाची माती, खत व वाळूमिश्रीत माती वापरात येत आहे. सदर प्लास्टीक पिशवीतील माती ही नाल्या शेजारीत एका शेत जमिनीतून आणली जात असल्याची माहिती आहे, परंतु नाल्याच्या काठ पोखरल्याच्या खुणा येथे दिसतात. नाला येथे पोखरला आहे. तो कुणी पोखरला हा मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. रोपवाटीका तयार होत असलेली जागा ही शासकीय आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकारातील ही जागा असून महसूल प्रशासनाची परवानगी येथे घेतली काय? असा प्रश्न आहे. सदर रोपवाटिका किमान दोन एकर परिसरात तयार होत आहे. यात आंबा, बदाम, कडुनिंब, आवळा, सिसम या वृक्षांचा येथे समावेश आहे. प्लास्टीक भरताना २:१:१ या नियमाने पिशवी भरण्याचा नियम आहे. गाळाची माती ५०० रुपये, शेणखत एक हजार रुपये प्रती घनमीटर, याप्रमाणे खर्चाची रक्कम सुचविण्यात आली आहे. लाखो रुपयांचा खर्च येथे सध्या केला जात आहे. किमान वृक्ष जगणे आवश्यक आहे.पिपरा येथील रोप निर्मितीकरिता लागणाऱ्या मातीकरिता कंत्राट दिले होते. त्यांनी माती कुठून आणली याबाबत माहिती नाही. माती दर्जात्मक असावी असे त्यांना सांगण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पाणी, जागेची नाहरकत घेतली आहे. रोपनिर्मिती जागेजवळील नाल्याचे पूर्वीच खोदकाम झाले होते. निविदेच्या माध्यमातून मातीचे कंत्राट देण्यात आले आहे.-आकांक्षा भालेकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सामाजिक वनीकरण, तुमसर.