शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साधारण रूग्णांना घरीच क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या उपाचाराची व्यवस्था करावी अशी मागणीही अग्रवाल यांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा : कोरोना नसलेल्या रूग्णांना केटीएसच्या नवीन वॉर्डात ठेवण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची सातत्याने वाढत चाललेली संख्या गंभीर बाब आहे. त्यातल्या त्यात शासकीय रूग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील अव्यवस्थेचे व्हिडिओ प्रामुख्याने वायरल होत आहे. या अव्यवस्थेमुळे सामान्य नागरिक तपासणीपासून वाचत आहे तेथेच क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी पुरजोर विरोध होत आहे. अशात साधारण परिस्थिती (असिम्टोमेटीक) असलेल्या रूग्णांना घरातच क्वारंटाईन करा अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन या विषयांवर चर्चा केली.चर्चेत अग्रवाल यांनी, अव्यवस्थेचे चित्र दररोज पुढे येत असताना आरोग्य प्रशासन फक्त पुरवठादारांकडून मशीन खरेदी करणे व जेवणाचे कंत्राट आपल्या माणसांना देण्याचे काम करीत आहे. आयसीएमआरने असिम्टोमेटीक कोरोना रूग्णांना घरीच क्वारंटाईन करण्याचे नवीन निर्देश आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप हे लागू करण्यात आले नाहीत. अशात जिल्ह्यातही साधारण रूग्णांना घरातच क्वारंटाईन करण्याची सूट द्यावी जेणेकरून शासकीय क्वारंटाईन सेंटरवरील बोजा कमी होऊन व्याप्त असुविधांपासून रूग्णांची सुटका होणार असे सूचविले.तसेच, आजघडीला कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांचा उपचार लगभग बंद झाला आहे. यामुळे गरिब रूग्णांचे हात होत आहेत. कित्येकांना बेड मिळत नसल्याने जमिनीवर ठेऊन उपचार केला जात आहे. त्यामुळे केटीएस रूग्णालयातील ओपीडीवरील नवीन वॉर्डात कोरोना बाधित नसलेल्या रूग्णांच्या उपाचाराची व्यवस्था करावी अशी मागणीही अग्रवाल यांनी केली. यावर डॉ. बलकवडे यांनी, सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष देत त्यावर त्वरीत कारवाईचे निर्देश दिले.सीटी स्कॅन मशीन त्वरीत सुरू करायाप्रसंगी अग्रवाल यांनी, रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन मागील ६ महिन्यांपासून बंद पडून असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. सीटी स्कॅन मशीनसाठी आम्ही तीन कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला होता व माहितीनुसार नवीन मशीन रूग्णालयात आली आहे. मात्र ती मशीन सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर जुनी व नवीन मशीन सुरू करण्याची मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी