शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मोठ्या जाऊने लहानीला विहिरीत ढकलले

By admin | Updated: November 24, 2014 22:59 IST

आपला नवरा मोठ्या जाऊचेच ऐकतो यामुळे तिने नवऱ्याला समज दिली. मात्र नवरा बायकोचे न ऐकता वहिनीचेच ऐकायचा. यामुळे दोन जावांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी

गोंदिया : आपला नवरा मोठ्या जाऊचेच ऐकतो यामुळे तिने नवऱ्याला समज दिली. मात्र नवरा बायकोचे न ऐकता वहिनीचेच ऐकायचा. यामुळे दोन जावांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मोठ्या जाऊने लहान जाऊला चक्क विहीरीत ढकलून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या शेतावर घडली. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढाकणी येथील लक्ष्मी युवराज राऊत (३२) ही महिला आपला पती युवराज याला मोठी जाऊ शामकला धर्मराज राऊत (३८) हिच्या घरी जाण्यास मनाई केली. तरी देखील तो तिच्या घरी जायचा व तिच्या मनाप्रमाणे वागायचा. यामुळे लक्ष्मी व शामकला यांच्यात वाद झाला. या वादातून शामकलाने लक्ष्मीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. १८ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे लक्ष्मी आपल्या शेतातील झोपडीत जेवणाचा डबा ठेवून अंगात घालणारा शर्ट शोधत होती. तो शर्ट विहीरीच्या तोंडीवर ठेवला होता. तो शर्ट घेण्यासाठी लक्ष्मी गेली असता विहीरीजवळ तीन फुटावर उभी असलेली श्यामकला मागून आली व लक्ष्मीला धक्का देऊन विहीरीत पाडले. ३० खोल फुट विहीरीतील पाण्यात पडलेली लक्ष्मी पाण्यात डुबकी खाऊन वर येताच तिने त्या विहीरीत मोटार पंपासाठी बसविलेल्या पाईपचा आधार घेतला. पायऱ्याच्या माध्यमातून वर येऊ लागली. त्यामुळे शामकलाने पुन्हा तिच्यावर दगडाने वार केला. परंतु लक्ष्मीने आरडाओरड केल्यामुळे दुसऱ्या बांधीत धान कापणारी लक्ष्मीची नणद देवलाबाई परसराम ठाकरे (४०) रा.ढाकणी ही धावत आली. तिने शामकलाला धक्का देऊन बाजूला केले व लक्ष्मीला हात देवून विहीरीतून बाहेर काढले. त्यानंतर लक्ष्मीने आपबिती घरच्यांना सांगितली. परंतु घरचेही हे प्रकरण दडपत असल्याचे पाहून लक्ष्मी आपल्या मुला-मुलींना घेऊन माहेरी गुरूवारी आली. शनिवारी या संदर्भात गंगाझरी पोलिसात तक्रार केली. गंगाझरी पोलिसांनी आरोपी श्यामकलाविरूध्द भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)