शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच ‘नाबार्ड’चा उद्देश

By admin | Updated: March 2, 2017 00:16 IST

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे.

 बी.एस.सुरान : आढावा बैठक बचत गटांचे माध्यम गोंदिया : बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास करणे हा नाबार्ड फायनांसचा (नॅब्फीन्स) उद्देश आहे. यासाठी स्वयं सहायता बचत गटांना नाबार्ड कर्ज पुरवठा करीत आहे, असे मार्गदर्शन नाबार्ड फायनांसशियल सर्व्हिसेस लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बी.एस. सुरान यांनी केले. ते इंडियन वेलफेयर सोसायटी गोंदिया येथे आढावा बैठकीत बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जनरल मॅनेजर ओ.पी. धोंडीयाल, डेप्युटी जनरल मॅनेजर मनोज चालाख, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा व्यवस्थापक त्र्यंबक मंगर उपस्थित होते. डॉ. सुरान पुढे म्हणाले, नॅब्फीन्स ही रिझर्व बँक आॅफ इंडिया कायदा १९३४ अन्वये एनबीएफसी एमएफआय म्हणून नोंदणीकृत आहे. नाबार्ड फायानांसचे व्याज दर १५.५० टक्के ते १६.९० टक्के असे असून उर्वरित बाकी रकमेवर असतो. नॅब्फीन्सचा मुख्य उद्देश्य नफा कमविणे हा नसून स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळत नाही, अशा लोकांना घरपोच वित्तीय सेवा पुरविणे व भांडवल उपलब्ध करून देणे, हा आहे. मात्र नाबार्ड फायनांसचे कर्ज कोणत्याही प्रकारे सुट व माफ नाही. बचत गटांनी घेतलेले कर्ज परतफेड करावे लागेल. बचत गटांनी घेतलेले कर्ज नियमित मासिक परतफेड केल्यानंतर पुढील कर्ज सहजरित्या मिळते, असे सांगितले. या वेळी अशोक बेलेकर यांनी प्रगती अहवाल सादर केला. एकूण ६८२ बचत गटांना २१ कोटी ४४ लाख रूपये संस्थेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले. नॅब्फीन्सने बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी कर्जाचा वापर मुलामुलींच्या शिक्षणासाठी, शौचालय बांधकामासाठी, व्यवसाय करण्यासाठी, घर बांधकामासाठी, शेतात बोअरवेल करण्यासाठी, शेतीकरिता अशा अनेक कामांसाठी करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, असे सांगितले. संचालन जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. बैठकीला इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)