शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:36 IST

सामाजिक व राजकीय जीवनात समाजकार्य करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होते. यात अनेक व्यक्ती सक्रीयतेने सहभाग घेतात. या कार्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आ. संजय पुराम यांनी सुरू केलेले समाजकार्य गतीशील व्हावे, जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असावे, .....

ठळक मुद्देउपेंद्र कोठेकर : नेत्र तपासणी, चष्मे वाटप व नेत्र शल्यक्रीया शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सामाजिक व राजकीय जीवनात समाजकार्य करण्याची संधी सर्वांना उपलब्ध होते. यात अनेक व्यक्ती सक्रीयतेने सहभाग घेतात. या कार्यात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. आ. संजय पुराम यांनी सुरू केलेले समाजकार्य गतीशील व्हावे, जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असावे, असे मत भारतीय जनता पक्षाचे माजी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्त केले.तालुक्यातील ग्राम ठाणा येथील गुरुकुल आश्रमशाळेत आयोजीत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व नेत्र शल्यक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार केशवराव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भेरसिंह नागपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, आमदार संजय पुराम, सविता पुराम, पणन सहकार लेखा समिती संचालक प्रा. सुभाष आकरे, जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, अमोल शिक्षण संस्थेचे सचिव एच.एस. पुंडे उपस्थित होते.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी आमदार पुराम यांनी, जनतेची सेवा करण्याची प्रत्यक्ष संधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेनेच दिली आहे. या सेवेत कधीही खंड पडणार नाही, असे आश्वस्त करीत त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमात केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, अल्ताफ हमीद यांनीही मार्गदर्शन केले. संचालन करून प्रास्ताविक सविता पुराम यांनी मांडले. आभार जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे यांनी मानले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश मटाले, अशोक पटले, योगेश्वरी पुंडे, ज्योती खोटेले, सुनंदा उके, अंजली जांभुळकर, यशवंत मानकर, राकेश शेंडे, राजू पटले, नरेंद्र बाजपेयी, हनवत वट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात नेत्र पेढी, जिल्हा अंधत्व निवारण यंत्रणा, जिल्हा आरोग्य विभाग यांच्यावतीने नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात दोन हजार नेत्र रुग्णांची तपासणी व ९५५ नेत्र पीडित रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. २१२ नेत्र रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेकरिता नोंदणी करण्यात आली.