शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा पटेल देणार कार्यकर्त्यांना नवचेतना

By admin | Updated: March 3, 2016 01:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी (दि.३) गोंदिया शहर व गोंदिया तालुक्यात होणार आहे.

राष्ट्रवादीचे आज : विविध ठिकाणी कार्यक्रमगोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी (दि.३) गोंदिया शहर व गोंदिया तालुक्यात होणार आहे. पूर्णा प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी या बैठकी होणार आहेत.दुपारी २ वाजता निवासस्थान बगिचा, रामनगर येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शहर युवक राष्ट्रवादी व शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. सायंकाळी ४.३० वाजता गोंदिया तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुडवा येथे मार्गदर्शन करणार आहे. यात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर उपस्थित राहतील.४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आ. राजेंद्र जैन यांनी निवड केलेल्या सडक-अर्जुनी तालुक्यातील आदर्श ग्राम डव्वा येथे वाचनालयाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासोबतच दुपारी २ वाजता नवेगावबांध येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी तथा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक व सत्कार कार्यक्रमाला पूर्णा पटेल उपस्थित राहणार आहे. ४ वाजता कोहमारा येथे सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी कार्यकर्ता बैठक, तर दि. ५ ला सायंकाळी ४ वाजता तिरोडा येथे शहर, तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीला संबोधित करणार आहे. या बैठकींना जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती सदस्य, सहकार क्षेत्राचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले.