शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनअभावी पुंगळे कुटुंबीयांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:28 IST

जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे.ही घटना आहे एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या निराधार झालेल्या कुटूंबाची, पतीच्या निधनानंतर शासनानेही हात झटकल्याने कुटूंबीयांना हक्काचे गाव सोडून वणवण भटकावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मशीटोला येथील मृत कर्मचारी भोजराज गोमा पुंगळे यांच्या कुटूंबाची ही व्यथा आहे. कर्मचारी भोजराज पुंगळे यांनी त्यांच्या हयातीत वेठबिगारालाही लाजवेल असे कष्ट उपसून गावात अक्षराची पेरणी केली.आयुष्याच्या उमेदीच्या काळात ब्र न काढता शासनाची चाकरी केली पण वयाच्या ३८ व्या वर्षी अचानक त्यांचे निधन झाले.सारच बिनसले भोजराज पुंगळे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शालू पुंगळे, सात वर्षाचा मुलगा हर्ष व तीन वर्षीय पूजा यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.पुंगळे यांनी काही दिवस मशीटोला येथे काम करुन दिवस काढले पण कुणाचीच मदत न मिळल्याने कधी कुण्या ओळखीच्या गावात तर आता माहेरी त्यांनी आसरा घेतला आहे.मृत कर्मचारी पुंगळे यांच्या वेतनातून सुमारे १ लाख ३२ हजार रुपयांची अंशदायी पेंशनची कपात करण्यात आली होती. गटविमा व इतरही कपाती करण्यात आल्या. परंतु शासनाकडून त्यांना आजवर कुठलीच मदत मिळालेली नाही.शासकीय कर्मचाºयांस त्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास १० लक्ष रुपये अनुदान देण्याचे आदेश आहेत. परंतु याचीही जाण विभागाला व शासनाला नाही. पुंगळे यांच्या पत्नी शालू पुंगळे या एएनएम व पदवीपर्यंत शिकलेल्या आहेत.तीन वर्षीय मुलीला सांभाळ करतानाच मुलाला शिक्षण देण्याचे काम त्या कष्ट उपसून करीत आहेत.तरी भविष्याच्या प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. शासकीय कर्मचाºयांच्या कुटूंबाची अशी दूरवस्था होत असेल तर भविष्यात कर्तव्यदक्ष युवक शासकीय नोकरीकडे पाठ दाखवतील यात दुमत नसावे.अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यापतीच्या निधनाने आपले कुटूंब वणवण भटकत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आपण नर्सिंग पदवी शिक्षीत असल्यामुळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी व जुनी पेंशन लागू करण्यात यावी.- शालू पुंगळे, मृतकाची पत्नी.