शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पुजारीटोला व कालिसराड रिकामे

By admin | Updated: July 6, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी

पाणी पेटणार : अन्य प्रकल्पांतही नाममात्र जलसाठागोंदिया : जिल्ह्यातील प्रकल्पांसह जुन्या मालगुजारी तलावांतून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. यंदा मात्र पावसाअभावी जिल्ह्यातील हे प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. तर जुन्या मालगुजारी तलावांचीसुद्धा हीच गत आहे. विशेष म्हणजे पाण्याचे प्रमुख स्त्रोत असलेले पुजारीटोला व कालिसराड हे दोन मोठे प्रकल्प आताच रिकामे झाले आहे. दुष्काळाच्या स्थितीत आता प्रकल्प आटत चालल्याने पाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्ह्याची तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. शिवाय चार मोठे व १० मध्यम, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव जिल्ह्याला लाभलेले आहेत. या जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच जिल्हावासीयांची शेती व गळ््याची तहान भागते. मात्र निसर्गाच्या तडाख्यापुढे यंदा जिल्ह्याला वरदान ठरलेले हे जलस्त्रोत यंदा हतबल ठरत आहेत. त्याचे असे की, जून महिना लोटला असून जुलै सुरू झाला आहे. मात्र अद्याप एक-दोन वेळा पडलेल्या पावसाच्या शिंतोड्यांखेरीज खरा पाऊस बरसलेला नाही. यामुळे जिल्ह्याला पाणी पुरविणारे जलस्त्रोत आटू लागले आहेत. या प्रकल्पांची आजची स्थिती बघितल्यास येणाऱ्या काही दिवसांनंतरचे भयावह वास्तव डोळ््या पुढे उभे राहते. यात जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांतील पुजारीटोला व कालिसराड हे प्रकल्प आता कोरडे पडले आहेत. सिरपूर प्रकल्पात २६.५९ टक्के व इटियाडोह प्र्रकल्पात १८.७६ टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांकडे बघता, बोदलकसा १४.५४ टक्के, चोरखमारा १८.३३ टक्के, चुलबंद २५.१८ टक्के, खैरबंधा १३.०३ टक्के, मानागड ७.८७ टक्के, रेंगेपार १६.१६ टक्के, संग्रामपूर ९.२१ टक्के, उमरझरी १५.७६ टक्के, कटंगी १६.८१ टक्के तर कलपाथरी ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. लघु प्रकल्पांत, आक्टीटोला ९.५७ टक्के, भदभद्या १७.६१ टक्के, डोंगरगाव ५.२७ टक्के, गुमडोह २.९४ टक्के, हरी १५.७५ टक्के, कालीमाती ४.१९ टक्के, मोगरा ३८.५९ टक्के, नवेगावबांध ९.३० टक्के, पिपरीया ५.७४ टक्के, पांगडी ०.५६ टक्के, रेहाडी ३.३० टक्के, राजोली ११.७२ टक्के, रिसाला ६.८१ टक्के, सडेपार ३१.४० टक्के, सेरपार २०.०७ टक्के, वडेगाव ७.५६ टक्के, ओवारा ३२.१९ टक्के पाणीसाठी आहे. सोनेगाव, सालेगाव व जुनेवानी लघु प्रकल्प ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. शिवाय जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती अत्यंत भयावह आहे. ३८ तलावांपैकी १९ तलाव ल.पा.खाली गेल्याची नोंद आहे. तर फुलचूर तलावात ४५.३२ टक्के, खैरी १.९५ टक्के, खमारी २०.९० टक्के, काटी १.९३ टक्के, कोसमतोंडी ११.५५ टक्के, कोकना १४.४५ टक्के, खोडशिवनी ८.२२ टक्के, खाडीपार १.५७ टक्के, मालीदुंगा ३४.७७ टक्के, मेंढा १.७० टक्के, मोरगाव २.२२ टक्के, माहुरकू डा ५८.१० टक्के, निमगाव ११.८९ टक्के, पळसगाव डव्वा २.९४ टक्के, पुतळी ५०.८२ टक्के, सौंदड २०.९७ टक्के एवढाच पाणीसाठी शिल्लक आहे. जिल्ह्यातील जलस्त्रोतांची ही स्थिती बघता पाऊस न बरसल्यास या प्रकल्पसुद्धा आटून पाणी पेटण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)