लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायीक प्रार्थना सुरू केली. जगात विश्वशांती नांदावी यासाठी आचार, विचार, व्यवहार बदलवून टाकणाऱ्या प्रार्थनेची सवय मुला-मुलींना लावा. उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्यांना सुसंस्कार देण्यासाठी प्रार्थनेची गोडी लावावी. कारण लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायीक प्रार्थना आहे असे प्रतिपादन हभप एम.ए. ठाकूर यांनी केले.जवळील ग्राम पदमपूर येथील श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात दहिकाला प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ठाकूर यांनी, जगात शांती नांदावी, सर्व जिव-जंतूंचे भले मागणाऱ्या तुकडोजी महाराजांनी आदर्श ग्राम निर्मीती मांडली. ग्रामगीतेतून प्रत्येक गोष्टीचे महत्व समजावून दिले. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धरी, ऐशी वर्णीली मातेची थोरी शेकडो गुरूहुनी’ म्हणत महिला आपल्या संततीला संस्कारक्षम बनवू शकते असे सांगीतले.व्यसनांवर बोलताना त्यांनी, व्यसनांची समाजाला कीड लागली आहे. या व्यसनांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. दुधापेक्षा दारूची किंमत अधिक आहे. सुदृढ शरीरासाठी दुधाची गरज असते दारूची नाही. परंतु स्वत:च्या खिशातील पैसे दारूवर खर्च करून अपमान ओढावून घेणारे आपला संसार उद्ध्वस्त करतात. दारूसारखे व्यसन अख्या कुटुंबाला संपविते असेही ते म्हणाले.दहीकाला करण्यासाठी श्री भवभूती महिला भजन मंडळाच्या यशोदा रहिले, सिता वारंगे, लक्ष्मी मेंढे, भागरथा भांडारकर, लक्ष्मी डोये, पारबता डोये, शांता खरकाटे, शंकर वारंगे यांनी भजन गात गणपती मंदिरातून दहिहंडी कार्यक्रमास्थळी आणली. आरती बनवारीया यांनी दहीहंडी डोक्यावर घेतली होती. गोपालकाल्याचे भजन सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.विशेष म्हणजे कार्यक्रमांतर्गत श्री गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवून शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमासाठी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अशोक चुटे, शंकर वारंगे, आडकु वंजारी, डॉ. भरत हुकरे, पुनाराम भांडारकर, ललीत भांडारकर, श्रीकृष्ण डोये, घनश्याम बागडे, फागुलाल डुंबरकांबळे, ग्यानिराम ठाकरे व इतर सदस्यांनी सहकार्य केले.
लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:58 PM
लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा समन्वय साधण्यासाठी सामुदायीक प्रार्थना सुरू केली. जगात विश्वशांती नांदावी यासाठी आचार, विचार, व्यवहार बदलवून टाकणाऱ्या प्रार्थनेची सवय मुला-मुलींना लावा. उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्यांना सुसंस्कार देण्यासाठी प्रार्थनेची गोडी लावावी. कारण लोकसुधारणेचे विद्यालय सामुदायीक प्रार्थना आहे असे प्रतिपादन हभप एम.ए. ठाकूर यांनी केले.जवळील ग्राम ...
ठळक मुद्देएम.ए.ठाकूर : तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सांगता