शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

परीक्षेविना जाहीर निकालाने कही खुशी कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) ...

गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. दहावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, रिझल्टमध्ये गर्ल्स रॉक्स ठरल्या आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यातच दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच नववीचे गुण आणि वर्षभराचे अंतर्गत मूल्यमापन या आधारावर दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. यंदाचा निकाल कसा जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. निकाल पाहण्याचे संकेतस्थळ बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा शुक्रवारी हिरमोड झाला. दहावीच्या निकालात यंदा नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात यंदा सुधारणा झाली आहे. यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली असून, ९९.९३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९९.९१ टक्के मुुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.

दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण १९ हजार २७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ हजार २६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ६,६६१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ९,७५६, तर व्दितीय श्रेणीत २,८६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात ४.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

.............

सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी

दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दहावीच्या परीक्षेत ९,९६२ विद्यार्थी, तर ९,२९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९१ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.९३ टक्के आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या.

.....................

सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के

यंदा कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतेक शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

...........

आता पालकांचे लक्ष मिशन अ‍ॅडमिशनकडे

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रवेशाची प्रक्रियासुध्दा ऑनलाईन राबविली जाण्याची शक्यता आहे.

..........

गुणवंत विद्यार्थ्यांची निराशा

परीक्षा न घेता यंदा प्रथमच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आले. त्यामुळे गुणवंत व अभ्यासू विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाली आहे. शाळेतूनच नव्हे तर जिल्हा आणि विभागातूून अव्वल येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. या निकालाने अव्हरेज विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्यात अभ्यास न करताच पास झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होता.

..............

वेबसाईट क्रॅकने विद्यार्थी आणि शिक्षण विभागाचा हिरमोड

शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची साईट दिवसभर उघडलीच नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची निराशा झाली. याचा फटका शिक्षण विभागाला बसल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याची भाषा करणाऱ्या शिक्षण विभागाला ऑनलाईन निकाल देण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

..................

दहावीच्या परीक्षेला बसलेले आणि उत्तीर्ण विद्यार्थी

एकृूण नोंदणी झालेले परीक्षेला बसलेले उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी

मुले मुली मुुले मुली मुले मुली मुले मुली

९९७० ९३०४ ९९७० ९३०४ ९९६२ ९२९८ ९९.९१ ९९.९३

..............................................