शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधी साक्षरता अभियानांच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:34 IST

नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देतालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : नालसा योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया यांच्या मार्गदर्शनात तालुका विधी सेवा समिती तिरोडाद्वारे १० दिवसांपर्यंत तालुक्यातील विविध ठिकाणी विधी साक्षरता अभियान राबवून जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमात तिरोडा तालुक्यातील शाळा-महाविद्यालये, अदानी पॉवर प्लांट, ग्रामपंचायत धादरी व ठाणेगाव येथील महाविद्यालयांमध्ये विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात महिला, मुले, जेष्ठ नागरिक व कामगारांच्या अधिकाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले.तालुका विधी सेवा समितीतर्फे या अभियानात एकूण ११ कार्यक्रम घेण्यात आले. पोलीस ठाणे तिरोडा येथे कैद्यांचे अधिकार व जमानत तसेच सायबर गुन्हे या विषयावर माहिती देण्यात आली. अदानी पॉवर प्लांटमध्ये कामगारांचे अधिकार व विमा योजनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच तहसील कार्यालय व ग्रामपंचायत धादरी येथे मोफत विधी सहायता व बँकेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वसतिगृह, शाळा- महाविद्यालयांमध्ये नागरिकांचे अधिकार, विद्यार्थ्यांचे अधिकार व मानवाधिकारांबाबत माहिती देण्यात आली. शासकीय रुग्णालयात विधी सहायता व व्यसनमुक्तीबाबत शिबिर घेण्यात आले. सदर अभियानाच्या समारोपाबाबत तालुका विधी सेवा समितीतर्फे तिरोडा शहरात पथसंचलन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये न्यायाधीश, सर्व वकील वर्ग, न्यायालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यानी व्यसनापासून व सायबर गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे, कामगार व शेतकºयांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांचा व योजनेचा लाभ घ्यावा. नागरिकांनी विधी सेवा समितीतर्फे देण्यात येणाºया मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचा उपभोग घ्यावा, असे आवाहन तिरोडा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश वि.प्र. खंदारे यांनी केले. कार्यक्रमांसाठी न्यायाधीश आर.डी. भुयारकर, न्यायाधीश डी.के. शाहुल, न्यायाधीश प्र.चु. बच्छेले यांनी मार्गदर्शन करुन नागरिकांना विधी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमात तालुका वकील संघाचे अध्यक्ष भांडारकर, उपाध्यक्ष हरिणखेडे, सचिव शेंडे, वरिष्ठ वकीलवर्ग यादव, मलेवार, गंगापारी, पारधी, पी.आर. भांडारकर, माधुरी रहांगडाले, वासनिक व इतर वकील मंडळीनी विविध कायदे व अधिकार या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले.