शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेळीपालनासाठी जनजागृती रॅली

By admin | Updated: August 22, 2016 00:18 IST

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवित गरीब कुटुंबियांच्या उपजिविका वाढविणावर भर देण्यात आला आहे.

गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवित गरीब कुटुंबियांच्या उपजिविका वाढविणावर भर देण्यात आला आहे. माविमच्या माध्यमातून तालुक्यातील ३७ गावात शेळीपालन उपजिविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत समुदाय पशूधन व्यवस्थापक व पशुसखींच्या माध्यमातून गरीब शेळीपालकांना कमीत कमी किमतीत चांगला उपचार मिळावा याकरीता ३७ पशूसखी व ४ समुदाय पशूधन व्यवस्थापक यांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.सालेकसा तालुक्यातील गरीब कुटुंबियांची उपजिविका मोठ्या प्रमाणात शेळीपालनावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त नागरिकांना शेळीपालनाविषयी माहिती व्हावी, त्यांचे लसीकरण, डी बिर्र्नींग याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी समुदाय साधन व्यक्तीच्या माध्यमातून बचतगटातील महिला, पशुसखी व गावातील नागरिक यांच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात शेळीपालनावर जनजागृती रॅली काढण्यात आली. या गावांमध्ये स्वयंसहायता महिला बचतगटातील सदस्य व गावातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.या रॅलीदरम्यान शेळीपालन व्यवसायबाबत यावेळी बकरी गरीब की गाय है, घर मे पाणी पिलाव बिमारी भगाव, दानामिश्रण खिलाव समय बचाव, बधियाकरण कराव बकरेका बजन बढाव, टिकाकरण कराव बिमारी भगाव, बिमा कराव बिमारी भगाव अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीच्या आयोजनाकरीता माविमचे तालुका व्यवस्थापक अनिल गायकवाड, उपजिविका विकास सल्लागार हंसराज रहांगडाले, समुदाय संघटक संगीता मस्के, शालू साखरे, प्रशांत बारेवार, सहयोगीनी उषा पटले, नयना कटरे, कामेश्वरी गोंडाणे, छाया मोटघरे, अर्चना कटरे, सुशीला बघेले, दुर्गा देशमुख, लेखापाल मुकेश भुजाडे उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय पशूधन व्यवस्थापक मेहाचंद ठेकवार, झनकलाल तुरकर, चमरु लिल्हारे, संतोष तुमसरे, देवेंद्र शहारे, पन्नालाल पटले यांनी सहकार्य केले.