गोंदिया : आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करण्यात आली. त्या तोतया पीएसआय वर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिरोडाच्या आझाद वॉर्डातील सुनील चैनराज येरपुडे यांच्या दुकानात दिनेश खोब्रागडे नाव सांगून तो अनोळखी व्यक्ती आला. त्याने आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत. आपल्याला दोन सोन्याच्या साखळ्या हव्या आहेत असे त्याने सांगितले. त्याने येरपुडे यांच्या दुकानातून २७.६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखय्या घेतल्या. त्या साखळ्यांची किंमत ७६ हजार ३०२ रूपये झाली. त्याने याचे पैसे धनादेशाच्या रूपाने दिले. तो धनादेश जिल्हामध्यवर्ती बँक भंडारा येथील असून त्याचा क्रमांक २९६१७३ आहे. हा धनादेश खाते क्र. ७९१३ या क्रमांकाचा दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. या प्रकरणात येरपुडे यांची त्या सिमाने फसवणुक केली. त्याच्याविरूध्द तिरोडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४१९, ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तोतया पीएसआयने ज्वेलरी मालकाला गंडविले
By admin | Updated: May 21, 2015 00:59 IST