शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:54 IST

तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम सुरळीतपणे करीत असतानाही पंचायत समितीमधील काही पदाधिकारी व सदस्य या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करून अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देतात.

ठळक मुद्दे१९ कर्मचारी सहभागी : पदाधिकारी व सदस्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम सुरळीतपणे करीत असतानाही पंचायत समितीमधील काही पदाधिकारी व सदस्य या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करून अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देतात. नेहमीचा हा प्रकार झाला असून यावर तोडगा निघावा यासाठी रोजगार हमी योजनेचे काम बघणाऱ्या पंचायत समितीमधील १९ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (दि.११) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कर्मचाºयांनी दिलेल्या निवेदनानुसार,संपूर्ण राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा अग्रेसर आहे. या योजनेचे काम पाहण्याकरीता पंचायत समितीमध्ये फक्त १९ कर्मचारी असून तेही कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. या तालुक्यात विविध ग्रामपंचायतमध्ये रोहयोच्या कामावर पाच हजार मजूर कार्यरत आहेत. असे असतानाही पंचायत समिती मधील उपसभापती व सदस्य कर्मचाºयांच्या कक्षात जाऊन त्यांना पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे.पैसे न दिल्यास आई, बहीण, पत्नीच्या नावाने अश्लील शब्दात शिवीगाळ करतात आणि मारझोड करण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले. या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून शुक्रवारपासून (दि.११) या योजनेत काम करणाºया सर्व १९ कंत्राटी कर्मचाºयांनी पंचायत समिती समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या १९ कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी मनोज हिरोळकर आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची व दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम व संगीता भेलावे यांना मिळताच त्यांनी लगेच या आंदोलनास्थळी भेट दिली. आंदोलनावर गेलेल्या कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना होत असलेल्या मानसिक त्रासाबाबद खेद व्यक्त करुन त्यांच्या मागणीला ताराम व भेलावे यांनी आपले समर्थन दिले.या आंदोलनामुळे मग्रारोह योजनेतील कामावर असणाऱ्या मजुरांचे हजेरी पत्रक काढणे आणि नवीन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम बंद पडल्याने तालुक्यात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या पाच हजार मजुरांवर रोजगारापासून वंचित होण्याची वेळ आली आहे.आंदोलनात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौतम साखरे, राजेश कापगते, जी. टी. पारधी, एस. एस. वलथरे, ए. एस. दाते, जे. एस. रहांगडाले, संजय डोये, मनोज बोपचे, निलेश वगारे, भुमेश्वर टेंभरे, किशोर ठाकरे, महेश बिसेन, आशिष रहांगडाले, संजय पाथोडे, बन्सोड, एस. एस. वाघमारे, व्ही. आर. बिसेन, हितेश नांदगाये या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदनया प्रकरणाबाबद १९ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरोळकर आणि गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना आपल्या सहीचे लेखी निवेदन देऊन या प्रकरणात आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती