शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST

सडक अर्जुनी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अर्जुनी मोरगाव आणि सडक ...

सडक अर्जुनी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, तसेच या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोना रुग्णांवर आवश्‍यक उपचार करावेत. खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, गंभीर रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा त्वरित करण्याची मागणी माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

अर्जुनी - मोरगाव आणि सडक - अर्जुनी तालुक्यात कोविड केअर सेंटर संख्या वाढत्या रुग्ण संख्येपुढे तोकडी पडत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये गृहविलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था नसते, अशात घरातील कोणाला कोरोनाची लागण झाली तर पूर्ण कुटुंबालाच संसर्गाचा धोका वाढतो. वाढत्या रुग्णसंख्येला इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरु करावे, लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. या प्रकाराने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी चर्चा केली. तसेच अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना तपासणी चाचणी करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदड येथे कोरोना चाचणी त्वरित सुरु करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.