शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST

बिरसी-फाटा : मागील एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असून, त्याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात लाॅकडाऊनमु‌ळे ...

बिरसी-फाटा : मागील एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असून, त्याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात लाॅकडाऊनमु‌ळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात शासनाने कलावंतांकडे दुर्लक्ष केले आहे. अशात शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलावंतांनी केली असून, आमदार, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

कोरोना या जागतिक महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली आहे. त्यामुळे कलावंत नियमांचे पालन करीत आहेत. संपूर्ण कार्यक्रम बंद असल्यामुळे त्यांचे हाल होऊन कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी त्यांना आर्थिक मदत देणे, वयोवृध्द कलावंतांना पेन्शन देणे व कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. यासाठी त्यांनी आमदार विजय रहांगडाले, तहसीलदार प्रशांत घोरूडे व पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन देताना प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाचे कलावंत अध्यक्ष सुनील बिसेन, महासचिव रत्नदीप टेंभेकर, रवींद्र वंजारी, सोनू महाजन, हितेश वालदे, हितेंद्र बावने, किरण वैद्दे, जयंत नंदागवळी, होलिराम जांभूळकर, जयकुमार जांभूळकर, रत्नाकर लांजेवार, भोजराज उरकुडे तसेच अन्य कलाकार उपस्थित होते.