परीक्षा सुरू होत असल्याने परीक्षा कालावधीत तापमान अधिक राहणार आहे. त्या अनुषंगाने मुख्य केंद्र व उपकेंद्रावर पिण्याचे स्वच्छ पाणी, वर्गखोल्यामध्ये पंखे व लाईट, तसेच सर्व शाळा परिसर सॅनिटाईज करून परीक्षा परिसरातील गवत काढून घ्यावे, हँडवॉश, सॅनिटायझर व थर्मल गन उपलब्ध करून द्यावे, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास केंद्र, उपकेंद्रावर जनरेटर उपलब्ध असावे, बैठक व्यवस्था बोर्डाच्या सूचनेप्रमाणे करण्यात यावी, तसेच बैठक व्यवस्था करताना कोविड-१९ च्या नियमाचे पालन करावे, परीक्षार्थ्यांना स्वत:सोबत पाणी व सॅनिटायझरची बॉटल, मास्क, आदींचा वापर करावा, परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याआधी विद्यार्थ्यांची तापमान मोजावी व हात सॅनिटाईज करण्यात यावे, एखाद्या परीक्षार्थ्यांचे तापमान जास्त असल्यास किंवा कोविडचे लक्षण असल्यास मंडळाच्या सूचनेप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्र. म. कच्छवे यांनी दिले आहे.
परीक्षा केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST