शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२९० तलावांत होणार मासोळ्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:08 IST

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देतलाव तेथे मासोळी अभियान : पाण्याअभावी नियोजित २२६ तलाव मासोळ्यांविना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्टÑ शासनाने यावर्षीपासून तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. यातील २९० तलावांमध्ये मासे टाकण्यात आले. तर २२६ तलावांत पाण्याचा ठणठणाट असल्याने मासोळ्यांचे उत्पादन या तलावात यंदा घेता येणार नाही.गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. मालगुजारी तलावांसह मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असल्याने या तलावांमध्ये मासेमारीचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. याच दृष्टीने शासनाने तलाव तेथे मासोळी अभियान राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा परिषदेने गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलाव मासोळी उत्पादनासाठी निवडले होते. परंतु यंदा पावसाअभावी अनेक तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे २२६ तलावांमध्ये मासोळी संवर्धन करता येणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावांमध्ये ११३.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत. देवरी तालुक्यातील ४९ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १४ तलावात २९० किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये ३ लाख जिरे टाकण्यात आले. आमगाव तालुक्यातील २४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४ तलावात ६५ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ६५ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया तालुक्यातील ९५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ तलावात ३२१ किलो बोटूकली तर ५३ तलावांमध्ये १३० लाख जिरे टाकण्यात आले. सालेकसा तालुक्यातील ७४ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४९ तलावात ७११ किलो बोटूकली तर ४ तलावांमध्ये १४ लाख जिरे टाकण्यात आले. सडक-अर्जुनी तालुक्यातील ७८ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २१ तलावात २३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ३० लाख जिरे टाकण्यात आले. तिरोडा तालुक्यातील ६६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ५ तलावात १३० किलो बोटूकली तर ९ तलावांमध्ये ५५ लाख जिरे टाकण्यात आले. गोरेगाव तालुक्यातील ७५ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २३ तलावात ३१४ किलो बोटूकली तर ११ तलावांमध्ये ७४ लाख जिरे टाकण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील ५१६ तलावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १८४ तलावात २०६१ किलो बोटूकली तर १०६ तलावांमध्ये ४८४.५ लाख जिरे टाकण्यात आले आहेत.८५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादनजिल्ह्यातील २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन होत असल्यामुळे या तलावातून ८ हजार ५३५ क्विंटल मासोळ्यांचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज जिल्हा परिषदेने वर्तविला आहे. गाव तेथे मासोळी अभियानाला गोंदिया जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे व इतर अधिकारी कामाला लागले आहेत.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला वाव आहे. मालगुजारी तलावांमध्ये सहजरीत्या मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जावू शकते. यासाठी शासनाचे तलाव तेथे मासोळी अभियान जिल्ह्यात यशस्वी होणार आहे. यंदा दुष्काळामुळे संपूर्ण तलावात मासोळ्यांचे उत्पादन घेतले जात नसले तरी २९० तलावांमध्ये मासोळ्यांचे संवर्धन केले जाणार आहे.रवींद्र ठाकरेमुख्य कार्यपालन अधिकारीजि.प.गोंदिया