शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१५० काळविटांचे संवर्धन

By admin | Updated: October 3, 2016 01:12 IST

वन्यप्राण्यांत शेड्यूल वन मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यांत वाढत आहे.

संरक्षित क्षेत्राची गरज : माळरान दिले माजी सैनिक व स्वतंत्र संग्राम सैनानींनानरेश रहिले  गोंदियावन्यप्राण्यांत शेड्यूल वन मध्ये मोडणाऱ्या काळविटांची संख्या गोंदिया जिल्ह्यात तीन तालुक्यांत वाढत आहे. आमगाव, गोंदिया व गोरेगाव या तीन तालुक्यांच्या मधातल्या भागात वास्तव्यास असलेल्या काळविटची संख्या १५० पेक्षा अधिक आहे. एकीकडे त्यांच्या संवर्धनासाठी वन्यप्रेमींची तळमळ सुरू आहे. मात्र दुसरीकडे काळविटांचे अधिवास असलेले माळरान दिवसेंदिवस कमी होत आहे. या वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी ‘माळरान बचाओ’चा नारा सेवा संस्थेने दिला आहे.वन्य जीवांमध्ये आकर्षित करणारा काळविट प्राणी राज्यात अकोला, अहमदनगर, अमरावती, नागपूर व गोंदिया येथे आहे. राज्यातील गोंदिया जिल्हा हा काळविटसाठी महत्वाचा असून येथील माळरान या प्राण्याला आवडते. मात्र जिल्ह्यातील माळरान नष्ट होत असल्याने मोठ्या संख्येत असलेल्या काळविटांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. या काळविटच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता आता भासू लागली आहे. दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची संख्या कमी होत आहे. ओसाड जंगलाना त्यांचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जंगलाचे संवर्धन वनविभाग करीत असले तरी याच वनाजवळील माळरानात वावरणाऱ्या काळविट प्राण्यांचा अधिवास संपत चालला आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तो शेताकडे वळत आहे. सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता १५० ते १८० च्या घरात गेली आहे. या काळविटांची संख्या वाढत असली तरी त्यांना वावरण्यासाठी पुरेसे माळरान नसल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळाने उपक्रम सुरू केला होता. या कार्याला सेवा संस्थेने माळरानावर कुरण निर्माण करण्याचे कार्य केले गेल्याने जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचा अधिवास टिकून आहे. सध्याचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांचे ओसाड झालेल्या माळरानावर कुरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याशिवाय त्यांच्यासाठी पाण्याची सोय म्हणून बंधारे बनविले, बोअरवेल तयार केले व टाकेही उभारले आहेत. सपाट झालेल्या मैदानावर कुरण तयार करून त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. परंतु हे माळरान गावाच्या अगदी जवळ असल्याने नागरिकांचा डोळा या प्राण्यांवर असतो. काळविटांची वाढती संख्या पाहुन त्यांच्यासाठी पुरेशे माळराण उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा मोर्चा शेताकडेही वळतो. परिणामी शिकार केली जाते.आधी मोठ्या प्रमाणात काळविटांची शिकार व्हायची. परंतु या संदर्भात वनविभागाने व निसर्ग मंडळाने मागील ७ वर्षापासून केलेल्या मेहनतीमुळे त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. या कालावधीत केलेल्या मेहनतीमुळे काळविटांचे संवर्धन होत आहे. वनविभागाने या प्राण्यासाठी विशेष निधी उपलब्ध न केल्यामुळे वनविभागालाही त्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माळराणाला लागून अनेक गावे असल्याने माळ राणातील हे प्राणी गावात शिरतात किंवा गावातील व्यक्ती त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणी वावरत असल्याने या प्राण्यांना धोका वाटू लागला आहे. आपल्या बचावासाठी सैरावैरा शेताकडे पळणाऱ्या या प्राण्यांची फासे टाकून व वीज लावून शिकार केली जाते. या काळविट करीता शासनाने माळरान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाने माजी सैनिक व स्वातंत्र संग्राम सैनिकांना वनजमीनीचे माळरान शेतीसाठी दिल्यामुळे या काळविटांना धोक्याची घंटा जाणवू लागली आहे. शासनाने माजी सैनिक व स्वातंत्र सैनिकांना दुसऱ्या ठिकाणी जमीनी दिल्यास काळविटांचे संरक्षण होवू शकते. त्यांच्या संवर्धनासाठी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर, दुष्यंत आकरे, चेतन जसानी, बबलु चुटे, प्रवीण मेंढे, विवेक खरकाटे काम करीत आहेत. अपघातांचे प्रमाण झाले कमीजिल्ह्यात काळविट पाच ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र या पाचही परिसरातून मोठे रस्ते गेल्यामुळे भ्रमण करताना महिन्याकाठी दोन काळविट अपघातात मरण पावत होते. परंतु आता अपघातांचेही प्रमाण कमी झाले आहे. चुलोद, नवरगाव, दतोरा, दागोटोला, तसेच अदासी परिसरापासून ते गोरेगाव तालुक्याच्या काही भागात पसरलेल्या क्षेत्रात काळवीट आढळतात.ठेवला जातोय वॉचकाळवीट बरोबर कुरणावर वावरणाऱ्या लांडग्यांचीही संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी एकही न दिसणाऱ्या लांडग्यांची संख्या आता बरीच झाली आहे. या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाने वॉच टॉवर उभारले आहे. त्या टॉवर वरून त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे.