सीमा कोरोटे : लोकमतच्या वटवृक्षाखाली महिलांना सुप्तगुण उजाळण्याची संधी आमगाव : लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘वन डे मेंबरशिप व ब्युटी सेमिनार’ तसेच केवायसी नोंदणी कार्यक्रमात शेकडो सखींनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी समाजसेविका सीमा सहषराम कोरोटे होते. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.रेणुका जणईकर, संयोजिका मोहिणी निंबार्ते, सहसंयोजिका जया राजीव फुंडे, सॉईन पार्लरचे विजय शेंडे, महाआनलाईनचे राजेश खोटेले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व. जवाहरलाल दर्डा, मानकर गुरुजी व शारदा मातेच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन करण्यात आली. तसेच ‘हमे इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गीत सखींनी सादर केले. प्रास्ताविक राजीव फुंडे यांनी केले. यावेळी सीमा कोरोटे, रेणुका जनीकर यांच्यासह शेकडो महिलांनी सखी सदस्यत्व ग्रहण केले. जुन्या काळी महिलांना चूल आणि मूल याच चाकोरीत दळून रहावे लागत होते. पण आज लोकमत सखी मंचच्या वटवृक्षाखाली असंख्य महिला आपल्यातील कला आणि सुप्तगुण जगासमोर सादर करीत आहेत. वृत्तपत्रात ज्ञान, कला, साहित्य, घडामोळी आदींबरोबर सखी मंच, युवा मंच, बालविकास मंचद्वारे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास होत आहे. त्यामुळेच देशातील नंबर-१ चे मराठी वृत्तपत्र म्हणून लोकमत जगासमोर तटस्थ उभे आहे, असे मत सीमा कोरोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. संचालन मोहीणी निंबार्ते यांनी केले. आभार ममता तुरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी निशा दरवडे, गीता येळे, राखी गुप्ता, ज्योती कोसरकर, सरोज गुप्ता, शीतल मेश्राम, रुक्मिणी हजारे, दिपाली उरकुडे, रंजनी शेंडे, सुनिता कोरे, रश्मी वासवाणी, बिरण बावणकर, तेजस्विनी माटे, स्रेहा मानकर, कविता हत्तीमारे, रचिता भांडारकर, पौर्णिमा वंजारी, अरुणा बहेकार, त्रिवेणी रहांगडाले, शहानी बिसेन, सरोज जगपत, हेमलता नागपुरे, निशा शेंडे, सुनिता भूते, वंदना मटाले, विना मानकर, अल्का फुंडे, शिला कोहरे, ममता नंदेश्वर, सुजिता नंदेश्वर, अर्चना मेंढे, अर्चना चंद्रिकापुरे, मंगला बोदेले, सरिता आतनुरकर आदींनी सहकार्य केले. मान्यवरांचे मार्गदर्शन डॉ. रेणुका जनईकर यांनी, कुटुंब सांभाळताना महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. याकरिता त्यांनी लक्ष दिले तर संपूर्ण कुटुंब आरोग्यमय राहतो, असे सांगितले. विजय शेंडे यांनी सखींनी त्वचेची निगा कशी राखावी आणि सुंदर दिसण्यासाठी घरगुती टिप्स सांगितले. महाआॅनलाईनचे राजेश खोटेले यांनी केवायसी व आधार लिंकिंगचे महत्व पटवून दिले. शासनाच्या वतीने महिलांसाठी अनेक रोजगार असल्याची माहिती दिली.
आमगावात सखी मंच सदस्य मोहिमेसाठी झुंबड
By admin | Updated: February 23, 2017 00:40 IST