शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अतितीव्र कुपोषित बालकांना प्रोटीनयुक्त पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:29 IST

आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे.

ठळक मुद्देग्राम बालविकास केंद्र : शासनमान्य पुरवठादारांकडून होणार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे. हा पाकीटबंद आहार शासनमान्य पुरवठादारांकडून पुरविला जाणार असल्यामुळे आतापर्यंत स्थानिक पातळीवर दिला जाणारा आहार बंद होईल. यांतर्गत आहारावर शासन प्रतिदिन प्रतिबालक ७५ रु पयापर्यंत खर्च करणार आहे.राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचा शासन निर्णय गेल्यावर्षी ११ आॅगस्ट रोजी महिला व बालविकास विभागाने जारी केला होता. त्यात शासनाकडून आहार पुरवठा करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. मात्र काही बचत गटांच्यावतीने यासंदर्भात न्यायालयाकडे धाव घेतल्याने तो निर्णय स्थगित होता.आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये बालविकास केंद्र सुरू केले असले तरी त्यांना लागणारा आहार स्थानिकस्तरावरच बनविला जात होता.आता न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त पुरवठादाराकडून तो आहार पुरविला जाणार असल्याचे पत्र सर्व आदिवासीबहुल जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यात सध्या ५७५ अतितीव्र कुपोषित बालके आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात सर्वत्र नवीन आहार पुरविला जाणार आहे. या नवीन आहारामुळे कुपोषित बालकांचे प्रमाण घटेल, अशी आशा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.पाकीटबंद आहाराचा तीनदा डोजजागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या शिफारसीनुसार तयार केलेल्या या नवीन आहारात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फोलिक अ‍ॅसिड, आयोडिन, फॅटी अ‍ॅसिड, साखर, शेंगदाण्याचा कूट असे घटक राहणार आहेत. अंगणवाडीत येणाऱ्या अतितीव्र कुपोषित बालकाला तेथील सेविका हा पाकीटबंद विशेष आहार दिवसातून किमान तीन वेळा खाऊ घालेल. शिल्लक राहिलेले पाकीट बालकाला घरी घेऊन जाण्यासाठी पालकाकडे दिले जाईल. दुसऱ्या दिवशी ते रिकामे झालेले पाकीट अंगणवाडीत संबंधित पालकांकडून जमा केले जाईल.