शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

जिल्ह्यातील प्रकल्प ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा घटत चालला : मध्यम व लघु प्रकल्पही कोरडे

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांसह अन्य मध्यम व लघु प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकल्पांत मोजकाच पाणी साठा शिल्लक असल्याची आकडेवारी असल्याने मान्सून येईपर्यंत यातील पाणी आणखी घटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्पच आता ऑक्सिजनवर असल्याने पावसाने यंदा साथ देण्याची गरज आहे.पावसाने दगा दिल्याने शेतीपासून सिंचनापर्यंत सर्वच गणित चुकल्याचे उत्तर आता पुढे येत आहे. पावसाच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची तहानही भागलेली नाही. हेच कारण आहे की, पावसाळ््याला आणखी महिनाभर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांत पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख प्रकल्पांची स्थिती बघता पाण्याचे नियोजन करणे खरच गरजेचे आहे असे दिसून येते.जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांतील सर्वात मोठे प्रकल्प म्हणजे इटियाडोह असून ३१७.८७ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पात आजघडीला ७८.४३ दलघमी एवढा पाणी साठा असून त्याची २४.६७ एवढी टक्केवारी आहे. सिरपूर प्रकल्पाची १५९.७८ दलघमी एवढी क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात ३५.८८ दलघमी एवढा पाणीसाठा असून त्याची २२.४५ एवढी टक्केवारी आहे. पूजारीटोला प्रकल्पाची ४३.५३ दलघमी पाणी साठवण क्षमता असून आजघडीला या प्रकल्पात १३.०६ दलघमी पाणीसाठा असून त्याची ३० एवढी टक्केवारी आहे.या प्रमुख प्रकल्पांची ही स्थिती असताना जिल्ह्यातील अन्य नऊ मध्यम व २२ लघु प्रकल्पांचीही स्थिती यापासून काही वेगळी नाही. मध्यम प्रकल्पांतील बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंधा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर प्रकल्पांची स्थितीही बरी नाही. या प्रकल्पांतही मोजकाच पाणीसाठा असल्याने उन्हाळ््यात तेही साथ सोडणार असल्याचे दिसते. फक्त कटंगी प्रकल्पात आजघडीला ३५.४३ टक्के व कलपाथरी प्रकल्पात ३९.३९ टक्के पाणीसाठा दिसून येत आहे. शिवाय लघु प्रकल्पांचीही स्थिती कही बरी नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारे हे प्रकल्प असून आणखी दोन महिन्यांत हे प्रकल्प मात्र आटणार असल्याचेही दिसते.मामा तलावही आटलेएकेकाळी शेतीला हातभार लावणारे मामा तलाव आतामात्र शेतीसाठी काहीच करू शकत नसल्याचे दिसत आहे. कारण ३८ तलावांची नोंद असलेल्या पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीनुसार या तलावांची स्थितीही काही ठीक नाही. मामा तलावातून अवघ्या गावांचा वापर होत होता. शिवाय शेतीची सुद्धा सोय होऊन जात होती. आजघडीला मात्र मामा तलावांनाच जीवनदानाची गरज आहे. तलावांतील गाळ काढून त्यांना जीवनदान मिळाल्यास हेच तलाव पुन्हा गावांसाठी जीवनदायी ठरणार.