शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:16 IST

नवेगावबांध राष्ट्रीय पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा डिसेंबर २०१७ पर्यंत मंजूर करुन विकास कामांना गती द्यावी.

ठळक मुद्देनवेगावबांध फाऊन्डेशनचा इशारा : राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध विकास आराखड्याला गती द्या

अमरचंद ठवरे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : नवेगावबांध राष्ट्रीय पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा डिसेंबर २०१७ पर्यंत मंजूर करुन विकास कामांना गती द्यावी. अन्यथा सत्ताधारी लोकप्रतिनिधींना नवेगावबांध व पर्यटन संकुल परिसरात प्रवेशबंदी करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा नवेगावबांध फाऊन्डेशनच्या वतीने देण्यात आला.राष्ट्रीय उद्यान म्हणून अख्या राज्यात नावारूपास असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला आता उतरती कळा लागली आहे. पर्यटकांना आकर्षित करणाºया सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. एकेकाळी वैभव प्राप्त असलेल्या राष्ट्रीय उद्यानाला घर-घर लागली असून गतवैभव प्राप्तीसाठी बोलक्या सुधारकांपेक्षा कर्त्या सुधारकांची आज गरज आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना नवेगावबांध फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, २० जुलै २०१७ रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय उद्यानातील लॉगहट विश्रामगृहात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पर्यटन समिती, वनविभाग, महसूल, वन्यजीव संरक्षण, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, आदि विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.पर्यटन संकुल परिसरातील ज्या भागाचा विकास करावयाचा आहे, त्या भागाची प्रत्यक्षात पाहणी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाºयांसह केली.बैठकीमध्ये थायलंडप्रमाणे वन्यजीव संरक्षण विभागाच्या अनुसूची क्रमांक १ ते ५ मधील वन्यप्राणी वगळून अन्य प्राण्यांचे प्राणी संग्रहालय उभारणे, शेगावच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणे, प्रवेशद्वारापासून ते संकुल परिसरात दुतर्फा शोभिवंत वृक्षांची लागवड करणे, गाव तिथे क्रीडांगण योजनेतून विशेष बाब म्हणून क्रीडांगण तयार करणे, हनुमान मंदिराच्या पायथ्याशी जलतरण तलाव, संजय कुटी परिसरात ३ किमीची मिनी ट्रेन तयार करणे, खोली पहाडी ते जे.टी. पार्इंट पर्वत रोपवे तयार करणे, मनोहर उद्यान, हिल टॉप गार्डन, वैभव गार्डन, हॉलीडे होम्स गार्डनचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणे, बालोद्यानात आकर्षक खेळणी बसविणे, ५० लाखांच्या खर्चातून तयार करण्यात आलेल्या व सद्यस्थितीमध्ये दैनावस्थेत असलेल्या रॉक गार्डन व कॉन्फरन्स हॉलचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी बाबींचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बैठकीत दिले होते.विकास आराखडा तयार करताना स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते. सदर बैठक होऊन दोन महिन्यांचा काळ लोेटला असला तरी बैठकीमधील विषयाला गती येवून दिशा मिळालेली दिसत नाही. संबंधित एकाही विभागाने पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची तत्परता दाखविण्याचे सामर्थ्य दाखविले नाही. तसेच कोणत्याही विभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क व विचारविनिमय करण्याचे साधे सौजन्य दाखविले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपालकमंत्र्यानी दिलेले आदेश प्रशासनातील कोणत्याही अधिकाºयांनी अंमलात आणले नाही. पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांनी बैठकीत दिलेले निर्देश बासणात गुंडाळून ठेवण्याचेच काम संबंधित अधिकाºयांनी केले, असा स्पष्ट आरोप नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या लेखी निवेदनातून केला आहे.