शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

विवेक मंदिर शाळेच्या ८५ विद्यार्थ्यांना प्राविण्य

By admin | Updated: June 19, 2014 00:09 IST

नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात गोंदियाच्या विवेक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठेच सुयश प्राप्त केले. विद्यालयातून एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८५ विद्यार्थी प्राविण्य

गोंदिया : नुकताच दहाव्या वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात गोंदियाच्या विवेक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मोठेच सुयश प्राप्त केले. विद्यालयातून एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. आकाश नितीन कोतवाल व दीपिका दामोदर वाघमारे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९७ टक्के गुण घेवून विद्यालय व जिल्ह्यातून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सौरभ देवेंद्र बघेले याने ९५.८ टक्के व शिखी अग्रवालने ९५.६ टक्के गुण घेवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मयुर संजीवकुमार रहांगडाले (९५.२ टक्के), मुस्कान दामोदर अग्रवाल (९४.८ टक्के), शिवानी नान्हू कापगते (९४.२ टक्के), रिया संजय पाटनी (९४.२ टक्के), निधी हितेश तिडके (९४ टक्के), रिया गजानन दियेवार (९३.८ टक्के), भाग्यश्री दीपक रहांगडाले (९३.४ टक्के), समिक्षा विजय रहांगडाले (९३.४ टक्के), रिचा मनोजकुमार रंगारी (९३.२ टक्के), कल्याणी विष्णू काचोले (९३ टक्के), जीनल उमंग पटेल (९२.६ टक्के), अनिस ओमेंद्र पटेल (९२.२ टक्के), अमन निरंजन अग्रवाल (९१.८ टक्के), शुभम सुरेश अग्रवाल (९१.८), हिमांशू रविंद्र मोहतुरे (९१.८), डिंमल अनंत बनकर (९१.६), हर्षल योगराज बिसेन (९१.२), रूद्राक्ष गजानन पटले (९१.२), पूजा सुशील अग्रवाल (९१), संजना मनोहर डुसेजा (९०.८), संचिता खंडेलवाल (९०.८), अंकुर रमेश कुंभलकर (९०.८) यांचा समावेश आहे. उल्लेखनिय म्हणजे सदर विद्यालयाने आपल्या पहिल्या बॅचपासून सतत १० वर्षांपर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. सतत पाच वर्षांपासून सर्व १०० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डी.व्ही. लक्ष्मी राव, सर्व शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले. (प्रतिनिधी)