लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्राट्रॅक्चर देव्हाडा यांच्या सौजन्याने येथील शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी आपल्या ८ एकर शेतीमध्ये ४ एकरात ८० -२३८ प्रतिच्या उसाची लागवड केली होती. त्यातून त्यांना धानाच्या उत्पादनापेक्षा उसापासून मिळणारे उत्पन्न चार पटीने अधिक मिळाले. त्यामुळे शेतकºयांनी सुद्धा आपल्या शेतात धानाला अधिक महत्व न देता ऊसाला प्राधान्य देवून अधिक नफा मिळवावा, असा सल्ला दिला.सदर शेतकºयाची लागूनच असलेल्या आपकारीटला येथे ८ एकर शेती आहे. त्या शेतात ते धानपीक घेत होते. धानपिकापासून मिळणारे उत्पन्न लागवड खर्चापेक्षा कमी असायचे. परिणामी तोटा सहन करावा लागला. मागील वर्षी त्यांनी देव्हाडा येथील मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधून चार एकरात ८० -२३८ प्रतिच्या ऊसाची लागवड केली होती. त्यातून धानाच्या उत्पादनापेक्षा ऊसापासून मिळणारे उत्पन्न चार पटीने अधिक मिळाले.या ऊसाचे वैशिष्ट्ये म्हणजे एकरी १०० टनापेक्षा अधिक, १० ते ११ महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणे, एक नग ऊसाचे वजन ३ किलोपासून ६ किलोपर्यंत असते. ऊसाची त्यांनी १५ ते २० फूट आणि २५ ते ३० टपोरे डोळे, पाने लांब, रुंद व चापट असतात. त्यामुळे अधिक शर्करा तयार होतो. इतर ऊसापेक्षा ८०-२३८ च्या उत्पन्नात साखर आणि शुक्रोजचे प्रमाण अधिक असते. गुळाची क्वॉलिटी अति उत्तम असते. खोडण्याचे उत्पन्न वाढत जाते. ऊस कडक व मजबूत असल्याने जंगली जनावरे खात नाही. काणी, तांबेरा व लाल्या रोगास प्रतिबंधक असतो. तुर्रा येत नाही. फुटवे आणि पक्व ऊसाचे प्रमाण अधिक असते. भारतात सर्वाधिक वेगाने प्रसारित होणारा हा एकमेव ऊस आहे. ऊस लागवडीसाठी लागणारा खर्च बºयाच प्रमाणात कमी असून पहिल्या वर्षी लावलेल्या ऊसाचे पीक तीन वर्षे सहज घेता येते. परिणामी ऊसाची शेती अधिक फायदेशीर ठरते.शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी सांगितले की, शेतात ऊस बघण्यासाठी बरेच अधिकारी आणि २०० हून अधिक शेतकºयांनी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे ऊस विकास अधिकारी भोजराज कापगते, यू.डी. चौधरी, गटप्रमुख उदाराम कापगते आणि कृषी सहायक अनिल उईके यांनी वेळोवेळी ऊसाची पाहणी करुन योग्य मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.
धानाच्या उत्पादनापेक्षा ऊसाचे उत्पादन चारपट अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:14 IST
मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्राट्रॅक्चर देव्हाडा यांच्या सौजन्याने येथील शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी आपल्या ८ एकर शेतीमध्ये ४ एकरात ८० -२३८ प्रतिच्या उसाची लागवड केली होती.
धानाच्या उत्पादनापेक्षा ऊसाचे उत्पादन चारपट अधिक
ठळक मुद्देकमल वैद्य यांचा सल्ला : पीक बदल करून उत्पादनात वाढ करा