शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे उत्पादन यंदा २० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:49 IST

धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाची तूट व कीडरोगांचा परिणाम : हवामानाचा अंदाज चुकला,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान निसविण्याच्या कालावधीतच पावसाने पाठ फिरविल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार एकूण उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. मात्र यंदा हवामान विभागाने सुरूवातीपासूनच चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज सुरूवातीला काही प्रमाणात ठरला. पिकांसाठी अनुकुल वातावरण असल्याने वाढ सुद्धा चांगली झाली.मात्र आता धान निघण्याच्या स्थितीत असताना मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने धानपिके संकटात आली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.महागड्या कीटकनाशकांची फवारणी करुन सुद्धा कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण असल्याचे चित्र आहे. यावर्षी धानाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांना हाती आलेली पिके गमाविण्याची पाळी आली आहे.यंदा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात जवळपास ५० हजार हेक्टरला सिंचनाची सोय आहे. बहुतेक शेतकरी सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या मदतीने पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने त्यांना नैसर्गिक पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.धान निसविण्याच्या कालावधीत पाऊस झाल्यास धान चांगला भरतो व उत्पादनात वाढ होते.मात्र नेमक्या याच कालावधी पाऊस बेपत्ता झाल्याने उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.भारनियमनाची भरआधीच पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आली आहे. त्यामुळे मोटारपंप लावून धरणे, विहिरी, तलावांच्या मदतीने शेतीला सिंचन करीत होते. मात्र मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. आधीच शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.किडरोग आणि पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात नेमकी किती टक्के घट होईल हे निश्चित सांगता येईल.- भाऊसाहेब बºहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.