शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन एकरातील कारली देणार १५ लाखांचे उत्पादन

By admin | Updated: August 30, 2014 01:47 IST

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एका लहानशा गावात भाजीपाला पिकांचे विक्रमी घेऊन एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासोबतच शेतकऱ्यांसमोर ...

राजेश मुनेश्वर सडक/अर्जुनीआधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन एका लहानशा गावात भाजीपाला पिकांचे विक्रमी घेऊन एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासोबतच शेतकऱ्यांसमोर पर्यायी पिकाचा आदर्श ठेवला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोकणा/जमीनदारी येथील डॉ.श्यामसुंदर दीक्षित व त्यांच्या पत्नी सीमा यांनी आपल्या साडेतीन एकर शेतात कारल्यांची लागवड केली आहे. यातून त्यांना १५ ते १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.डॉ.दीक्षित हे नेहमी आपल्या शेतात विविध पिकांची लागवड करण्याचा प्रयोग करीत असतात. त्यांनी गावात सन २००८-०९ मध्ये तीन एकरात केळीची लागवड केली होती. यानंतर सन २०१२ मध्ये टरबुजांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकापेक्षा फळपिकांमध्ये कमी श्रमात अधिक फायदा कसा घेता येऊ शकते याची उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. पिकांची निगा व बियाण्यांची पारख कशी करावी, हेसुद्धा कौशल्य त्यांच्यात आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळ्या पिकांची लागवड करून जास्त उत्पादन घेण्यासाठी त्यांनी कारल्यांची निवड केली. कारली पिकाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता डॉ.दीक्षित म्हणाले, साडेतीन एकरमध्ये कारली पिकाचे उत्पादन घेण्यासाठी गावातील १० मजुरांना कामावर ठेवले आहे. सध्या कारल्यांचे भाव ३० ते ४० रूपये किलो आहे. चांगला बाजारभाव मिळाल्याने मिळत ही अपेक्षेपेक्षा जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.मागील १५ दिवसांपासून दररोज पाच ते सहा पोती कारली निघत आहेत. ही कारली नागपूर, गोंदिया, देवरी, सडक/अर्जुनी, वडसा, साकोली, राजनांदगाव या ठिकाणी पाठविली जात आहे. डॉ.दीक्षित हे कारली पिकावर जैविक औषधांची फवारणी करतात. शेतकऱ्यांनीसुद्धा विषारी कीटकनाशकांची फवारणी करू नये, असा सल्ला ते देतात.