शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुराम यांनी जाणून घेतल्या समस्या

By admin | Updated: September 25, 2015 02:26 IST

आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील काही गावांचा जनसंपर्क दौरा करून प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील काही गावांचा जनसंपर्क दौरा करून प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. एक दिवसीय दौऱ्यात विचारपूर, टोयागोंदी, दल्लाटोला, डघराटोला, दरेकसा, कहाली, पिपरीया या गावांमध्ये भेट देऊन गावातील सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांनी आपल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली. यात श्रावणबाळ योजनेचा लाभ, घरकुल योजनेचा लाभ, गावातील रस्ते याबाबत लोकांनी मनमोकळेपणाने समस्या सांगितल्या. या समस्या आ. पुराम यांनी दूर करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल काही अधिकाऱ्यांना त्याचवेळी फोनवर संपर्क करुन निर्देश दिले. आदिवासी भागातील अपूर्ण प्रकल्प बेवारटोला, कुआढास प्रकल्प पूर्ण करण्याचे निवेदन त्यांना देण्यात आले. जनसंपर्क दौऱ्यात आ. संजय पुराम यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राकेश शर्मा, तालुकाध्यक्ष खेमराज लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर मडावी तालुका महामंत्री राजेंद्र बडोले, उमेदवार जैतवार, परसराम फुंडे व इतर पदाधिकारी सहभागी झाले. (प्रतिनिधी)