शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढतेय प्रदूषणाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:57 IST

पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे.

ठळक मुद्देसावधान : कारखान्यामुळे प्रदूषणात वाढ, समस्येकडे दुर्लक्ष, यंत्रणेचा अभाव

जागतिक पर्यावरण दिनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाळा गोंदिया जिल्हावासीयांसाठी तापदायकच ठरतो़ पावसाळ्यातही कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावसाळ्यात नगर परिषदेकडून पावसाळा पूर्वीची कामे करणे जोमाने सुरू आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा गोंदिया शहरवासीयांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही नगरपरिषद देत आहे. परंतु येत्या काही दिवसांतच पावसाळा सुरू होत असल्याने चित्र स्पष्ट होईल़पावसाळ्याला घेऊन गोंदिया नगर परिषदेतर्फे नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मान्सून पूर्व तयारी केली जाते. परंतु दरवर्षी कितीही तयार केली जात असली तरी पहिल्या पावसातच नगर परिषदेची पोलखोल होते. गोंदियातील रस्त्यांवर असलेले व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हा मुद्दा देखील गोंदिया शहराच्या विकास कामांना अडथळा घालणारा असतो. गोंदियाच्या बाजार परिसरातील नाल्यांमध्ये व्यापारी वर्गाकडून प्लास्टीक टाकण्यात येत असल्यामुळे नाल्यांमध्ये गाळ साचून राहतो. दुकानासमोरील नाल्यांवर सिमेंट कॉँक्रीटचे झाकण व्यापाऱ्यांनी बसविल्यामुळे त्या ठिकाणच्या नालीतील घाण नगर परिषदेला काढता येत नाही. नगर परिषदेने नाल्या स्वच्छ करण्याचा माणस जरी लावल्याचे दाखविले तर त्या काळापूरता आपला व्यवसाय बुडेल हे गृहीत धरून व्यापारी वर्ग आपल्या संबधीत लोकप्रतिनिधींना बोलतात. ते लोकप्रतिनिधी व्यापाºयांच्या सोयीसाठी नाल्यास्वच्छतेकडे दुर्लक्ष करा असा अलिखीत फतवा काढतात. नगर परिषदेच्या हद्दीत लाखोची वाहने आहेत. परंतु या वाहनांतून निघणाºया धुरावर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने वृक्षारोपणाची योजना राबविली नाही. रस्त्याच्या बाजूला झाडे लावली नाही. गोंदिया शहर हिरवेगार दिसण्याऐवजी सिमेंट कांक्रीटचे जंगल दिसत आहे. वाहनांमधून बाहेर पडणाºया धूरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गोंदियातील घाणीच्या साम्राज्यामुळे अनेक ठिकाणचे जलस्त्रोत दूषित आहेत.प्रशासन काय उपाय करतेय?पावसाळा म्हटला की गोंदिया शहरवासीयांना नाकीनऊ आणणारा काळच ठरतो. तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवर साचलेले पाणी व जागोजागी चिखल अशात शहरवासीयांना हा काळ घालवावा लागतो. त्यामुळे पावसाळा एकप्रकारे शहरवासीयांना नकोसाच होतो. यंदा मात्र शहरवासीयांना पावसाळा जास्त त्रासदायक ठरू नये यादृष्टीने नगर परिषद यावर तोडगा म्हणून काही उपाय करीत आहे. यंदाच्या पावसाळ््यात पावसाचे पाणी नाल्यांत तुंबू नये यासाठी मान्सून पूर्व सफाई अभियानातून मोठे नाले व अंतर्गत लहान नाल्यांची सफाई केली जात आहे. जेसीबी व पोकलॅन मशीनसह मजुरांची एक टीमच नाली सफाईच्या कामासाठी लावण्यात आली आहे. रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यंदा नगर परिषदेने शहरातील विविध प्रभागांत सुमारे २२ कोटींच्या रस्त्यांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे शहरातील पूर्वी सारखी असलेली स्थिती यंदा निर्माण होणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. तरिही काही भागात पावसाच्या पाण्यामुळे काही त्रास उद्भवल्यास नगर परिषद प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्पर आहे. स्वच्छता विभागाला याबाबत तसे निर्देश देण्यात आले असून नगराध्यक्ष, पदाधिकारी व मुख्याधिकारी नजर ठेवून राहतील.४७०० वृक्ष लागवडीचे टार्गेटपावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे मान्सूनपूर्व काळात घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे.नगर परिषदेने पावसाळा बघता मान्सून पूर्व सफाई अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत शहरातील मोठे नाले जेसीबी व पोकलॅन मशीन लावून सफाई केली जात आहे.याशिवाय मॉन्सून पूर्व सफाई अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर माणसे घेवून शहरातील अंतर्गत नाल्यांची सफाई करविली जात आहे. जेणेकरून पावसाचे पाणी शहरात साचून राहू नये.वाढते तापमान बघता यावर तोडगा म्हणून राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषद हातभार लावत असून शहारात वृक्ष लागवड केली जाणार आहे.यंदा नगर परिषदेला चार हजार ७०० रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार, नगर परिषद नियोजन करीत आहे.