शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ

By admin | Updated: June 20, 2017 00:51 IST

दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.

एकाही शाळेचा १०० टक्के निकाल नाही : शिक्षणावरील कोट्यवधींचा खर्च पाण्यातलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात कित्येक खासगी शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. तर दुसरीकडे मात्र पालिकेच्या शाळा १०० टक्के निकालापासून नेहमीप्रमाणे वंचित आहेत. नगर परिषद व शासनाकडून नगर परिषदेच्या शाळांवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र निकालाची ही टक्केवारी बघता कोट्यवधींचा हा खर्च पाण्यात जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. दहावीच्या परीक्षेत एकेवेळी बोर्डाचे टॉपर देणारी नगर परिषदेची म्युनिसिपल हायस्कूल म्हणून ओळखली जात होती. कालांतराने मात्र नगर परिषदेच्या या शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. १०० टक्के तर सोडाच मात्र ९० टक्केच्यावर निकाल देण्यात या शाळा असमर्थ ठरत असल्याची वास्तविकता बघावयास मिळत आहे. हेच कारण आहे की, पालकांचा कल आता खासगी शाळांकडे वाढला असून नगर परिषदेच्या शाळांत आपल्या अपत्यांना टाकण्यास त्यांची अनिच्छा दिसते. खासगी शाळांतील नाममात्र पगारावर काम करणारे शिक्षक त्यांच्या शाळेचा निकाल १०० टक्के देत आहेत. तर उलट गलेलठ्ठ पगार घेऊनही पालिकेच्या शाळांतील शिक्षक मात्र अपयशी ठरत आहेत. अशात खासगी शाळांतील मोजक्या पगारावर काम करणारे शिक्षक जास्त गुणवंत आहेत, असे आता जनताच बोलत आहे. शासन व पालिकेकडून शाळांवर नाहीतरी कोट्यवधींच्या घरात खर्च केला जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य सुविधा दिल्या जात आहेत. एवढ्यावरही नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा काही वाढत नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेच्या शाळांची गत नगर परिषदेच्या शाळांसारखीच होती. जिद्द व चिकाटीमुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगी शाळांना टक्कर देत आहेत. मात्र नगर परिषदेच्या शाळांची स्थिती आहे तीच आहे. पटसंख्या बोटावर मोजण्या एवढीच असून तेवढ्या विद्यार्थ्यांकडूनही पाहिजे तसा निकाल काढण्यात शिक्षक अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशात भविष्यात नगर परिषदेच्या या शाळांचा वाली कोण असा प्रश्न येथे उपस्थित होतो. बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थी नगर परिषद शाळांतील निकालाची ही स्थिती बघता शाळांत शिक्षणाची काय गत आहे हे दिसून येते. तर पटसंख्येची स्थितीही यापासून वेगळी नाही. पालिकेच्या कॉन्व्हेट व प्राथमिक शाळांत तर एक-दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय माध्यमिक शाळांतील आकडेवारीही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून दिसून येते. यातून पालिकेच्या शाळांची स्थिती किती गंभीर दिसून येते. पालिकेच्या या स्थितीला नगर परिषद प्रशासन व पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शाळांवर लगाम कसणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शाळांत शिक्षक तर राहतील मात्र विद्यार्थी राहणार नाहीत. मुलींनीच मारली बाजी नगर परिषदेच्या पाच माध्यमिक शाळा शहरात आहेत. यात येथील एस.एस. गर्ल्स शाळेने सर्वाधिक ९२.६६ टक्के निकाल देऊन बाजी मारली आहे. येथील १०९ मुलींनी परीक्षा दिली होती व त्यात १०१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शिवाय म्युनिसीपल हायस्कूलमधून ११८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व त्यातील ८६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७२.८८ टक्के निकाल आहे. रामनगर म्युनिसीपल शाळेतून २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ३४.४८ टक्के निकाल दिला आहे. म्युनिसीपल हायर शाळेतून १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती व १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.५१ टक्के निकाल दिला. तर माताटोली शाळेतील ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ४०.६७ टक्के निकाल दिला आहे.