शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या संख्येत घट होताच खासगी रुग्णालय बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

गोंदिया : मागील दीड महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील ...

गोंदिया : मागील दीड महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड हाऊसफुल होते. जिल्ह्यातील १९ खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता रुग्णसंख्येत घट होताच ८ खासगी रुग्णालयांना यातून बाद करण्यात आले.

मार्च २०२१ पासून राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. त्यातच एप्रिल २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहावयास मिळाला. वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत चालला होता, तसेच रुग्णांमध्ये एकच धावपळ उडाली होती. या संधीचा लाभ घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील व्यावसायिक डॉक्टरांमध्येही शर्यत सुरू झाली. दरम्यान, एकामागे एक खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाकडे साकडे टाकत, तसेच जनप्रतिनिधींच्या माध्यमातून धागेदोरे लावून कोविड रुग्णांवर उपचार करून घेण्याची परवानगी मिळवून घेतली. यामुळे गोंदिया जिल्ह्यात एक-एक करता १९ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. १९ रुग्णालयांमध्ये जवळपास ६६३ पेक्षा अधिक बेड तयार करण्यात आले होते. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयेदेखील हाऊसफुल झाले. एवढेच नव्हे, तर रुग्णांना बेडअभावी घरीही परत जावे लागले. मात्र, मे महिन्यापासून जिल्ह्यात संसर्गाचा वेग मंदावला आणि कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने क्रियाशील रुग्णांच्या संख्येत घट येऊ लागली. सद्य:स्थितीत १९ पैकी ८ रुग्णालये एकही बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल नसल्यामुळे ते रुग्णालय कोविड सेवेच्या यादीतून बाद झाले आहे, तर उर्वरित ११ रुग्णालयांमध्ये फक्त १८० रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयातही ६० टक्के बेड रिकामे आहेत.