शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची अवैध विक्री करणाऱ्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 00:06 IST

औषध विक्री करण्याचा परवाना निलंबित केलेला असतानाही, जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या

सव्वा लाखांचा साठा जप्त : भंडारा एफडीएची गोंदियात कारवाई गोंदिया : औषध विक्री करण्याचा परवाना निलंबित केलेला असतानाही, जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात असलेल्या सुकडी डाकराम येथील एका औषधालयातून औषधांची विक्री सुरू होती. यावरून भंडारा येथील अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून १.२५ लाखांचा औषधसाठा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तिरोडा तालुक्यात सुकडी येथे राजेश कोठीकर यांच्या मालकीचे मे.चक्रधर मेडीकल अ‍ॅण्ड जनरल स्टेअर्स आहे. या औषध विक्री दुकानाची ९ एप्रिलला औषध निरीक्षक मनिष गोतमारे यांनी तपासणी केली होती. या तपासणीत गंभीर दोष आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त दा. रा. गहाणे यांनी त्यांचा परवाना ११ जुलै ते ९ आॅगस्ट या ३० दिवसांसाठी निलंबित केला होता. औषध विक्रीचा परवाना नसतानाही दुकान मालकाने औषधांची विक्री सुरूच ठेवली होती. या माहितीवरून एफडीएने गुरूवारला सायंकाळी सापळा रचून औषध खरेदीसाठी एक बनावट ग्राहक पाठविला. त्याला दुकानदाराने औषध दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या एफडीएच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत १ लाख २५ हजारांचा औषधसाठा जप्त केला. ही कारवाई सहायक आयुक्त दा. रा. गहाणे, औषध निरीक्षक मनिष गोतमारे, प्रशांत रामटेके यांनी केली. अनेक दिवसानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. जिल्ह्यात या विभागाकडे नियमित कर्मचारी नाही. (जिल्हा प्रतिनिधी)