शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:08 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नाही.

ठळक मुद्देरूग्णांचे हाल : वैद्यकीय अधिकाºयांची त्वरित नेमणूक करा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे रूग्णाची गैरसोय होत आहे. येथील रूग्णसेवा कोलमडली असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र वाºयावर असल्याचे चित्र आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रेंगेपार, पांढरी, हलबीटोला, गोंगले, मुरपार, बकीटोला, भोयरटोला, डुंडा, घटेगाव, मालीजुंगा, सितेपार, शिवनटोला आदी गावांतील रुग्ण औषधोपचारासाठी येतात. परंतु येथील शासकीय वैद्यकीय अधिकाºयांची बदली झाली. त्याच्या जागेवर दुसºया वैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती न झाल्याने रूग्णांवर योग्य उपचार होत नाही. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. रूग्णसंख्या वाढली आहे. आपल्या व कुटुंबाच्या उपचारासाठी येथील आरोग्य केंद्रात रोजच रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. परंतु येथील सर्व कारभार रामभरोसे असल्याचे चित्र आहे.या ठिकाणी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आले आहेत. तर दुसरे ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणारे डॉक्टर आहेत. परंतु सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया डॉक्टरांचा ११ महिन्यांचा कालावधी संपला आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रामध्ये शासकीय डॉक्टरांचे पद रिक्त आहे. या प्रकाराकडे लक्ष देवून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांनी त्वरित या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता, पांढरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. ब्राम्हणकर या वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. परंतु ते सध्या तहसील कार्यालय सडक-अर्जुनी येथील आरोग्य केंद्रामध्ये ठाण मांडून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पूर्वीपासूनच शासकीय अधिकारी व कर्मचाºयांची कमतरता आहे. शिवाय सद्यस्थितीत परिसरातील गावांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढला आहे. सदर केंद्रात औषधोपचार मिळत नसल्याने रूग्ण खासगी व बोगस डॉक्टरांकडे जावून उपचार करून घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.