शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बैल जोड्यांच्या किमतीत दुपटीने वाढ

By admin | Updated: June 12, 2017 01:29 IST

खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : खरीप हंगामाला आता लवकरच सुरुवात होणार असून मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे. शेतात नांगरणी, शेणखत टाकण्यासाठी बैलांचा उपयोग केला जातो. बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेतीउपयोगी बैलांच्या संख्येत घट होत असल्याने बैल बाजारामध्ये बैलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे सामान्य शेतकरी पैशाअभावी बैलजोडी खरेदी करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरी जनावरे असायची. मात्र आता शेतकऱ्यांकडे जनावरे दिसणे दुरापास्त झाले आहे. दूध देणाऱ्या संकरित गाईचे प्रमाण शेतकऱ्यांकडे वाढले आहे. अधिक नफा मिळविण्याच्या दृष्टिकोनातून दुधाळू जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जे घरी बैल तयार व्हायचे, ते आता नाहीसे झाल्याने शेतकऱ्यांना बाजारातून बैल घ्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, काटीनगर व मध्य प्रदेशातील हिर्री आदी बाजारात कमीत कमी दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बैल विक्री होत आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने वाढलेल्या किमतीत बैल खरेदी करणे शक्य नसल्याने त्याचा परिणाम शेतकामावर पडत आहे. शेतीचे व्यापारीकरण झाल्यामुळे व सिंचनाच्या सोईमुळे शेतकरी वर्षातून तीनवेळा पीक घेऊ लागला आहे. चराईसाठी जागा नसल्यामुळे जनावर मालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांकडील जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. शेतकऱ्यांना शेतकामासाठी खात्रीलायक बैल मिळत नसल्यामुळे बैल बाजारात बैलांच्या किमतीत दुपटीने वाढ झाले आहे. वाढीव किमतीमुळे नवीन बैलजोडी कशी घ्यावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.