शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पावसाळ्यात उद्भवलेल्या जलजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना

By admin | Updated: June 26, 2014 23:23 IST

पावसाळा सुरू होत असताना जलजन्य अनेक साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलजन्य साथरोग नियंत्रण व शुध्द पाणी पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अनेक

लोहारा : पावसाळा सुरू होत असताना जलजन्य अनेक साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलजन्य साथरोग नियंत्रण व शुध्द पाणी पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अनेक उपाय सूचविण्यात आले आहेत.कॉलरा, अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर असे अनेक प्रकारचे रोग पिण्याच्या दूषित पाण्यामुळे होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात पिण्याचे पाणी योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण करून वापरावे. लोकांना साथरोगाबाबद सतर्कता बाळगण्याविषयी जनजागृती करावी. ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर कमीतकमी तीन महिने पुरेल एवढा नियमित उपलब्ध राहील, याप्रमाणे खरेदी करून ठेवावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतात योग्य प्रमाणात ब्लीचिंग पावडर घालून जनतेला शुध्द पाण्याचा नियमित पुरवठा करावा. ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा नियमित आयोजित करून या विषयावर सविस्तर चर्चा करून गावात जनजागृती करावी. नळ योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप लाईनची तपासणी करून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. खडे असल्यास वेळीच बुजविण्यात यावे. गावातील गटारे व नाल्यातील सांडपाणी वाहण्याची ठिकाणे स्वच्छ करून वाहते करावे. विहिरींच्या व हातपंपाच्या सभोवताल पाणी साचून राहणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. विहिरीचे ओटे, हातपंपाचे ओटे फुटलेले असल्यास त्याची दुरूस्ती त्वरीत करावी. परिसर स्वच्छ ठेवणे, केरकचरा व पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट करावी. याबाबद जनतेला जागृतीचे प्रबोधन द्यावे. डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी दर आठवड्यात दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा. पाणी पुरवठा करताना ब्लिचिंग पॉवडरमध्ये ३३ टके व त्यापेक्षा जास्त क्लोरिन असावे, याची दक्षता घ्यावी. निकृष्ट दर्जाचा ब्लिचिंग पॉवडरचा वापर करू नये, या पद्धतींचा उपयोग करावा, असे आव्हान देवरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)