शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा होणार?

By admin | Updated: January 13, 2015 23:01 IST

गोंदिया नगर परिषदेच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खारिज करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहे.

गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खारिज करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहे. सोबतच त्या अनुषंगाने परिणामकारक अधिसूचनाही रद्दबातल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गोंदिया नगर पालिकेतील अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रियाही पुन्हा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशामुळे तीनही सदस्यांना त्यांचे अधिकार परत मिळाले. त्यामुळे ते सदस्य नगर पालिकेत पुन्हा परतले. फेरनिवडणूक झाल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे पुन्हा बहुमत वाढून बळकावलेली सत्ता भाजपला गमवावी लागण्याची शक्यता आहे.भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनिल पांडे यांनी कॉंग्रेस पक्षात परतून आलेल्या भगत ठकरानी, ममता बंसोड व निर्मला मिश्रा या तीन सदस्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर तत्कालीन अपर जिल्हाधिकारी कारकर यांनी तिनही सदस्यांच्या विरोधात निर्णय सुनावत त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र त्या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचीका दाखल केली होती. या याचिकेवर ६ जानेवारी २०१५ ला दिलेल्या निर्णयात न्यायालयाने तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करीत प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच त्या अनुषंगाने परिणामकारक अधिसूचनाही रद्द करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, नगर परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक तिनही सदस्यांच्या रिट याचिकेमधील उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून घेण्यात येत असल्याचे नमूद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवड आपोआपच रद्दबातल होते. अशात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेला अध्यक्ष व उपाध्यक्षांची फेरनिवडणूक घ्यावी लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या ११ मार्च रोजी सभापतींचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसोबतच किंवा त्यापूर्वी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)