शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जिल्हा नियोजनाचे प्रस्ताव १५ दिवसात सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:10 IST

जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : विकास कामांचा निधी वेळेत खर्च करा, बांधकामाची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येते. सन २०१८-१९ मध्ये तिन्ही योजना मिळून २६७ कोटी ६१ लाखांचा नियतव्यय मंजूर असून हा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यासाठी निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव पंधरा दिवसात नियोजन विभागाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपायुक्त नियोजन फिरके, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत सन २०१७-१८ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. मागील वर्षी तिन्ही योजना मिळून २५७ कोटी १९ लाख ८८ हजार नियतव्यय मंजूर होता. त्यापैकी २५४ कोटी १७ लाख ३ हजार एवढा खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ९८.८२ एवढी आहे. पालकमंत्री म्हणाले, यंत्रणांनी निधी मागणीसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. प्रस्ताव हे परिपूर्ण असावेत असेही त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरु स्ती, वर्ग खोल्यांची दुरु स्ती, शाळांची आवार भिंत, तालुका क्र ीडा संकुलाचा वीज पुरवठा आदी विषय सदस्यांनी उपस्थित केले असता हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना बडोले यांनी दिल्या. जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांना नुकसान झाल्यामुळे सन२०१८-१८ ची लीज कॅरी फॉरवर्ड करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. त्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालक मंत्र्यांनी दिल्या. आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामासाठी ३.५० कोटी रुपये तर अंगणवाडी बांधकाम या योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुका क्र ीडा संकुल गोरेगाव येथील निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. गोंदिया शहरातील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पालिकेने पाठवावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील अतिक्र मण व शहर विकास आराखडा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मलेरिया निर्मूलनासाठी ग्रामपंचायतनी काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, पट्टे वाटप, धान्य वाटप, मामा तलाव दुरु स्ती आदी योजनांचा जिल्हाधिकारी यांनी विशेष आढावा घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सर्व सदस्य व अधिकाऱ्यांंनी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.सडक अर्जुनी येथे सैनिक भरती पूर्व प्रशिक्षणसडक अर्जुनी येथे सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र उघडण्यात येणार आहे. यासाठी क्र ीडा विभागाने नियोजन करावे. प्रशिक्षण केंद्रासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी क्रीडा विभागाने युध्दपातळीवर कामाला लागण्याचे निर्देश दिले.सिकलसेल मेळावाजिल्ह्यात सिकलसेल जनजागृती कार्यक्र म व्यापक स्वरूपात राबविण्यात यावा.यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.रिक्त पदे त्वरीत भराजिल्ह्यातील विविध शासकीय विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. एकाच अधिकाºयाकडे दोन ते तीन विभागाचा प्रभार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. तर नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना एकाच कामासाठी वांरवार चकरा मारव्या लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागात रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले