शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘नानीबाई का मायरा’चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:09 IST

जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाची मनोकामना घेवून मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीतर्फे पूज्य राधा स्वरुपा जयकिशोरी यांच्या मधुर वाणीत नानीबाई का मायरा हा तीन दिवसीय कथा कार्यक्रम येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आज (दि.१८) हजारो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी खा. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांनी राधा स्वरुपा जयकिशोर यांचा ओढणी देऊन सत्कार केला. तसेच या वेळी त्यांनी विधीवत पूजा अर्चा केली.

ठळक मुद्देराधा स्वरुपा जयाकिशोरी यांचा सत्कार : प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाची मनोकामना घेवून मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीतर्फे पूज्य राधा स्वरुपा जयकिशोरी यांच्या मधुर वाणीत नानीबाई का मायरा हा तीन दिवसीय कथा कार्यक्रम येथील सर्कस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. आज (दि.१८) हजारो भाविकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी खा. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांनी राधा स्वरुपा जयकिशोर यांचा ओढणी देऊन सत्कार केला. तसेच या वेळी त्यांनी विधीवत पूजा अर्चा केली.या वेळी खा.मधुकर कुकडे, माजी आ.राजेंद्र जैन, किरण पटेल, भिखुभाई पटेल, माजी आ.दिलीप बन्सोड, नगराध्यक्ष अशोक इंगळे, राधेश्याम अग्रवाल, निखील जैन उपस्थित होते. नानीबाई का मायरा कार्यक्रमा दरम्यान जयकिशोरी यांनी श्रीकृष्ण व राधा यांच्या विविध कथा सांगितल्या.जयकिशोरी यांच्या मधुर वाणीतून कथा ऐकून उपस्थित भाविक सुध्दा भक्ती तल्लीन होवून नाचू व गाऊ लागले. त्यामुळे कार्यक्रम स्थळी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.तर प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल यांनी सुध्दा या भक्तीमय वातावरणात समरस होवून उपस्थितांचा उत्साह वाढविला.कार्यक्रमाच्या पूर्वी वर्षा पटेल यांनी मायरा भरण्यासाठी पोहचल्या. या वेळी त्यांनी राधा स्वरुपा जयाकिशोरी यांना मोत्यांचा हार, नथनी, बाजूबंद, आणि विविध रत्नजडीत दागिने लावून जयकिशोरी यांचा श्रृंगार केला. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा वाजवून उत्साह वाढविला. या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी नानीबाई का मायरा कार्यक्रमा दरम्यान कथांचे वाचन करुन तीन दिवस भक्तीमय वातावरण निर्माण केल्याबद्दल जयाकिशोरी यांचे आभार मानले.या वेळी गोपालनाथजी महाराज यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वाद दिले. नानीबाई का मायरा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमी व गोंदिया शिक्षण संस्थेच्या कर्मचाºयांचा या वेळी सत्कार करण्यात आला.विविध संस्थाचे आभारमनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या वतीने येथील सर्कस मैदानावर तीन दिवस आयोजित नानीबाई का मायरा या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध संस्थांनी सहकार्य केले. याबद्दल अ‍ॅकडमीचे संरक्षक प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन यांनी मारवाडी युवक मंडळ, मारवाडी महिला मंडळ, चौरसीया समाज, सिंधी जनरल पंचायत, हरे माधव सत्संग समिती, बढते कदम, बाबा गुरुमुखदास सेवा समिती, सिंधी पंचायत महिला समिती, सख्खर पंचायत, सिंधू सेना, ब्राम्हण सेना, गुजराती राष्टÑीय केलवणी मंडळ, वामा सेवा समिती, यश समिती, मटका कोला समिती यासह विविध समित्यांचे आभार मानले.भावनिक प्रसंगनानीबाई का मायरा दरम्यान राधा स्वरुपा जयाकिशोरी यांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या कथेचे वाचन करीत होत्या. श्रीकृष्ण आणि राणी रुक्मणी यांनी स्वत: भक्त नरसिंह महाराज यांची मुलगी नानी च्या विवाहात मायरा भरण्यासाठी पोहचल्याच्या कथेचा सार सांगितला. या दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल या ओढणी व मायरा घेवून कार्यक्रम स्थळी मंचावर पोहचले. या भावनिक प्रसंगाने कार्यक्रमास्थळी काही क्षण भावनिक वातावरण निर्माण झाले होते.