शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात प्राणीगणनेसाठी सज्ज

By admin | Updated: May 20, 2016 01:34 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात विना दुर्बिन, विना कॅमेरा वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे.

३४३ जणांचे अर्ज : २०३ कर्मचाऱ्यांसह २०३ वन्यजीव पे्रमी करणार निरीक्षणगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात विना दुर्बिन, विना कॅमेरा वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व वन्यजीव विभाग सज्ज झाला असून २१ मे रोजी सकाळी ९ वाजता प्राणी गणनेचा शुभारंभ होईल व त्याची सांगता २२ मे रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येईल. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य, कोका अभयारण्य, नवेगाव पार्क व नवेगाव अभयारण्यांचा समावेश आहे. येथील जलस्त्रोतांवर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्य प्राण्याची गणना करण्यासाठी मुंबई, नागपूर, गोंदिया यासह राज्य व राज्याबाहेरीलही वन्यजीव प्रेमींनी अर्ज केले होते. मात्र वन विभागाकडून मचानवरी जागेच्या उपलब्धतेनुसार काही वन्यप्रेमींना वगळण्यात आले तर काहींची निवड करण्यात आली आहे. त्याची माहिती त्यांच्या मोबाईवर देण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून एकूण ३४३ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. एकूण १९२ मचानांवरून निरीक्षण करण्यात येणार असून २०३ वन्यजीव प्रेमींचे अर्ज मंजूर करण्यात आली आहेत. या २०३ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे प्रत्येकी एक याप्रमाणे २०३ वन कर्मचारी मचानांवर उपस्थित राहणार आहेत. शिवाय वन व वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी, राऊंड आॅफिसर व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागझिरा अभयारण्यात ५९ मचान उभारण्यात आले असून त्यावर बसण्याची क्षमता ७० वन्यजीव प्रेमींची आहे. त्यासाठी १७५ अर्ज आले होते. यापैकी ७० वन्यजीव प्रेमींच्या अर्जांना मंजुरी मिळाली असून त्यांच्यासह ७० वन विभागाचे कर्मचारी राहणार आहेत. तर न्यू नागझिरा अभयारण्यात ४१ मचान उभारण्यात आले आहेत. त्यासाठी ४१ अर्ज आले. या ४१ वन्यजीव प्रेमींसह वन, वन्यजीव विभागाचे ४१ कर्मचारी राहणार आहेत. कोका अभयारण्यात २२ मचान तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ५१ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी २२ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या २२ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे २२ कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नवेगाव पार्कमध्ये ४२ मचान तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ४६ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी चार अर्ज नामंजूर करून ४२ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या ४२ वन्यजीव प्रेमींसह ४२ वन विभागाचे कर्मचारी राहणार आहेत. तर नवेगाव अभयारण्यात २८ मचान उभारण्यात आले. त्यासाठी ३० वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी २८ जणांची निवड करण्यात आली. या २८ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे २८ कर्मचारी हजर राहणार आहेत.(प्रतिनिधी)