शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

कामे तयार, पण मजुरांची वाणवा

By admin | Updated: February 23, 2017 00:16 IST

गोंदिया जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून यावर्षी आतापर्यंत ३ हजार ९०८ कामांवर ....

नरेश रहिले  गोंदिया गोंदिया जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून यावर्षी आतापर्यंत ३ हजार ९०८ कामांवर २ लाख ५८ हजार ८०४ मजुरांना काम दिले आहे. त्या मजुरांनी ६३ लाख २१ हजार ४९१ दिवस काम केले आहे. जिल्ह्यातील लोकांना मागेल त्याला १०० दिवस काम देण्याची हमी शासनाने दिली आहे. त्यासाठी रोहयोची मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली, परंतु या कामांवर मजूरच येत नसल्याने आजघडीला जिल्ह्यात जॉबकार्डधारक २ लाख ५८ हजार ८५२ मजुरांपैकी केवळ ६ हजार ५११ मजूर काम करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने सान २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ४०७ कामे, तर मागच्या वर्षातील १ हजार ९०६ कामे असे एकूण ४ हजार ३१३ सुरू करायची होती. यातील ३ हजार ९०८ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर जिल्ह्याच्या १ लाख २६ हजार ९८७ कुटुंबातील २ लाख ५८ हजार ८२५ मजूरांना ६३ लाख २१ हजार ४९१ दिवस काम देण्यात आले. आताही कामे सुरू आहेत. परंतु या कामावर आता मजूर येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या रबी पिक मोठ्या प्रमाणात काढण्यात येत असल्याने रोवणीच्या कामावर मजूर जात आहेत. मार्च महिन्यात उर्वरीत ४०५ कामे सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची शासनाची तयारी आहे परंतु मजूर कामच मागत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत ४७९ ग्राम पंचायतीअंतर्गत एकही काम सुरू नाही. गावात काम मिळत नाही म्हणून मजुरांचा गोंधळ सुरू आहे तर काम आहे पण मजूर नाहीत असा जिल्हा प्रशासनाचा कांगावा असल्यामुळे नेमके चुकते कुठे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी मजूर वर्गातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) ७२ ग्राम पंचायतींच्या कामांवर ६५११ मजूर रोहयो चालविणाऱ्या रोजगार सेवकांनी आपापल्या मागण्यांना घेऊन १५ फेब्रुवारीपासून संप पुकारल्याने बहुतांश गावातील कामे बंद आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४७९ ग्राम पंचायतीअंतर्गत एकही काम सुरू नाहीत. परंतु ७२ ग्राम पंचायतीअंतर्गत २१४ कामे सुरू असून त्या कामांवर ६ हजार ५११ मजूर कार्यरत आहेत. शौचालय व घरकुलाचे अधिक काम सद्या स्थितीत शौचालय व घरकुलाचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शौचालयाची ८६ कामे सुरू असून त्या कामांवर २७५, घरकुलाच्या ५९ कामांवर २३१ मजूर, कम्पोष्ट खताची चार कामे, जमीन सपाटी करणाच्या एका कामावर २० मजूर, वृक्ष लागवडीच्या ११ कामांवर ५४ मजूर, नाला सरळीूकरणाच्या ७ कामांवर १ हजार ७३२ मजूर, शेततळीच्या एका कामावर २८ मजूर, विहीरींच्या ३ कामांवर ३४ मजूर, भातखाचरच्या ६ कामांवर १३८ मजूर, तलाव खोलीकरणाच्या १२ कामांवर २ हजार ४६५ मजूर तर पांदण रस्त्याच्या २४ कामांवर १ हजार ५२६ मजूर कार्यरत आहेत.